ETV Bharat / entertainment

Dunki teaser released : शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित 'डंकी'चा टीझर प्रदर्शित; प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी किंग खान सज्ज - डंकीचा टीझर प्रदर्शित

Dunki teaser released राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'डंकी'चा टीझर शाहरुख खानच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये खूप दिवसानंतर किंग खान हा रोमँटिक स्टाईलमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे.

Dunki teaser released
डंकीचा टीझर रिलीज झाला आहे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 11:46 AM IST

Updated : Nov 2, 2023, 3:45 PM IST

मुंबई - Dunki teaser released : शाहरुख खानचा आगामी 'डंकी' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. किंग खानच्या चाहत्यांची 'डंकी'ची झलक पाहण्याची प्रतीक्षा आता संपली आहे. शाहरुख खाननं त्याच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी 'डिंकी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. निर्मात्यांनी टीझरऐवजी 1 मिनिट 48 सेकंदाच्या या व्हिडिओला 'ड्रॉप 1' असं नाव दिलं आहे. 'जवान' आणि 'पठाण'मध्ये चाहत्यांनी शाहरुख खानला अ‍ॅक्शन मोडमध्ये पाहिलं आहे. दरम्यान 'डिंकी'मध्ये किंग खान हा चाहत्यांना रोमँटिक शैलीत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 22 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक खूप आतुरतेनं वाट पाहत आहेत. या चित्रपटामध्ये शाहरुख खान व्यतिरिक्त तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी, दिया मिर्झा आणि आणखी काही कलाकार दिसणार आहेत. 'डंकी'मध्ये किंग खान नाचताना आणि कॉमेडी करताना दिसेल.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'डिंकीचा टीझर : शाहरुख खाननं टीझर रिलीज करत लिहलं, 'साध्या आणि वास्तविक लोकांची कहाणी जे त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मैत्रीची, प्रेमाची आणि एकत्र राहण्याची कहाणी... एका नात्यात राहण्याची कहाणी, ज्याचे नाव घर आहे. मनाला स्पर्श करणारी कथाकाराची कहाणी. या प्रवासाचा एक भाग बनणे हा एक सन्मान आहे आणि मला आशा आहे की तुम्ही सर्वजण आमच्यासोबत या प्रवासाचा भाग व्हाल'. किंग खानं शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. याशिवाय काहीजण त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

'डंकी'ची चित्रपटाची कहाणी : 'डंकी ड्रॉप 1'मध्ये 5 मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. जे इंग्लंडला जाण्याचे स्वप्न पाहत आहेत. परदेशात जाण्यासाठी त्यांची धडपड सुरूच आहे. शाहरुख खाननं आपल्या मित्रांना सांभाळण्याची जबाबदारी घेतली आहे. चित्रपटाची संपूर्ण कहाणी याच भोवती फिरते. चित्रपटाची कथा 'डंकी फ्लाइट' बेकायदेशीर इमिग्रेशन तंत्रावर आधारित आहे. राजकुमार हिरानी यांनी स्थलांतरितांची कहाणी 'डंकी'द्वारे दाखवली आहे, जे आपले जीवन सुधारण्यासाठी आपला देश सोडून परदेशात जातात. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.

हेही वाचा :

  1. SRK Birthday : मन्नत बाहेर दिवाळी : 'मी तुमच्या प्रेमाच्या स्वप्नात जगतो', म्हणत शाहरुखनं मानलं आभार
  2. Varun And Lavanya Marriage : चिरंजीवी आणि नागा बाबू यांनी सोशल मीडियावर वरुण तेज आणि लावण्याच्या लग्नाची फोटो केली शेअर
  3. Happy Birthday Srk : शाहरुखचा थक्क करणारा अष्टपैलू प्रवास, रोमान्स किंग बनला अ‍ॅक्शन स्टार

Last Updated : Nov 2, 2023, 3:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.