ETV Bharat / entertainment

शाहरुख खान आणि राजकुमार हिराणीच्या पहिल्या चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया - राजकुमार हिराणी डंकी

Dunki first reactions out: शाहरुख खानचा वर्षातील तिसरा चित्रपट गुरुवारी मोठ्या उत्साहात थिएटरमध्ये दाखल झाला. चित्रपटगृहांबाहेर सुरु असलेल्या जल्लोष करणाऱ्या चाहत्यांपासून ते चित्रपट पाहून प्रतिक्रिया देणाऱ्या सामान्य प्रेक्षकापर्यंत लोक काय बोलताहेत हे ऑनलाईन पाहायला मिळत आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित शाहरुख खान स्टारर 'डंकी' चित्रपटासाठी तुमची तिकिटे बुक करण्यापूर्वी तुम्हाला हे सर्व माहित असणे आवश्यक आहे.

Reactions to the movie Dunky were mixed
डंकी चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 21, 2023, 12:29 PM IST

मुंबई - Dunki first reactions out: शाहरुख खान स्टारर 'डंकी' चित्रपटाची प्रतीक्षा संपली आणि पहिल्या दिवशी पहिला शो पाहण्यासाठी देशभर चित्रपटगृहाच्या बाहेर किंग खानच्या चाहत्यांनी गर्दी केली. मुंबईत पहिला शो पहाटे 5 वाजून 55 मिनीटांनी वाजत गाजत पार पडला. यावेळी शाहरुखच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर अमाप उत्साह दिसत होता. शाहरुखच्या फॅन क्लबने अनेक व्हिडिओ शेअर केलेत. यामध्ये लोकांचा मोठा जमाव ढोलाच्या तालावर नाचताना आणि 'डंकी'च्या रिलीजला सुरुवात करण्यासाठी फटाके वाजवताना दिसत आहे.

थिएटर्सच्या बाहेर मोठे कटआउट देखील पाहायला मिळत आहेत. चाहत्यांचा हा उत्साह पाहून शाहरुख खानही भारावून गेलाय आणि त्याने एक्स हँडलवरुन सर्वांचे आभार मानले आहेत. 'डंकी'चे दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केले असून त्यात तापसी पन्नू, विकी कौशल आणि बोमन इराणी यांच्याही भूमिका आहेत.

'डंकी'चे लेखन अभिजात जोशी, राजकुमार हिराणी आणि कनिका धिल्लन यांनी केले आहे. मनू, सुखी, बुग्गू आणि बल्ली या चार मित्रांची ही हृदयस्पर्शी गोष्ट आहे. हे चौघेही चांगल्या आयुष्यासाठी लंडनमध्ये स्थायिक होण्याचे स्वप्न पाहतात परंतु त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी एक कठीण परंतु जीवन बदलणारा प्रवास करावा लागतो.

शाहरुखच्या एका कलंदर चाहत्यानं एक अतरंगी गोष्ट करत थिएटरमधून 'डंकी' चित्रपट थेट लाईव्ह करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्याचे हे स्ट्रिमिंग 50 मिनीटे सुरू होते. या स्ट्रमिंग 1 लाख 30 हजार लोकांनी पाहिले आहे. आता हा व्हिडिओ काढून टाकण्यात आला आहे.

शाहरुख खानला प्रेक्षकांनी रोमँटिक, अ‍ॅक्शन चित्रपटातून आजवर पाहिलं आहे. परंतु त्याच्याकडे कॉमेडीचेही उत्तम टायमिंग आहे हे 'डंकी'तून स्पष्ट झाल्याची भावना काहींनी व्यक्त केली आहे.

प्रसिद्ध ट्रेड अ‍ॅनालिस्ट कोमल नाहटा यांनी डंकी ब्लॉकबस्टर असल्याचं म्हटलंय. "राजकुमार हिराणींचा हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत भावनांनी भरलेला आहे. शाहरुखनं त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. विकी कौशल आणि तापसी पन्नूसह इतर सहकलाकारांनी उत्तम काम केले आहे.", असे त्यांनी लिहिलंय.

एक्सवरील रिव्ह्यूमध्ये काही लोकांनी हा चित्रपट अजिबात आवडला नसल्याचं म्हटलंय. "डंकी हा राजकुमार हिराणीचा आजवरचा सर्वात कुमकुवत चित्रपट आहे. यातले विनोद हास्यास्पद वाटतात. तापसी पन्नू आणि शाहरुख खानची केमेस्ट्री अजिबात जुळलेली नाही. स्क्रिप्ट आणि एक्झ्यूकेशन फिके पडले" अशा प्रकारची एक प्रतिक्रिया आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

सोशल मीडियावर अनेकजण विकी कौशलला 'डंकी'च्या सीनमध्ये बाजी मारली असल्याचं म्हणताहेत. "सहाय्यक अभिनेता म्हणून विकी कौशलनं चित्रपटावर राज्य केलंय. तो डंकीसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्कारांना पात्र आहे," असे एकाने लिहिलय.

हेही वाचा -

  1. 'डंकी' रिलीजनंतर चाहत्यांनी केला जल्लोष ; शाहरुख खाननं मानलं आभार
  2. हिराणींच्या 'पीके' आणि 'संजू'च्या पहिल्या दिवशीची कमाई पार करणार का 'डंकी'?
  3. करण जोहरनं केली 'शो टाइम' वेब सीरीजची घोषणा ; पोस्ट केली शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.