मुंबई - Dunki song Lutt Putt Gaya: 'डंकी'च्या आकर्षक टीझरनंतर तमाम चाहते शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाची नवी झलक पाहण्यासाठी उतावीळ झाले होते. दिग्दर्शक राजकुमार हिराणीनं 20 नोव्हेंबरला त्याच्या वाढदिवसा निमित्त 'लुट पुट गया' गाण्याच्या लॉन्चिंगची तारीख कळवली होती. त्यानुसार हे बहुप्रतीक्षत गाणं आज लॉन्च करण्यात आलं आणि किंग खानच्या चाहत्यांसाठी आभाळ ठेंगणं झालं.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'डंकी' चित्रपटातील 'लुट पुट गया' हे गाणं चित्रपटाबद्दलचा अपेक्षा एका उंचीवर नेणारं आहे. आयपी सिंग आणि स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेल्या या गाण्याला संगीतकार प्रीतमनं संगीतबद्ध केलंय तर लोकप्रिय गायक अरिजीत सिंगनं स्वरसाज चढवलाय. या गाण्यात शाहरुख खान आणि तापसी पन्नूची जबरदस्त केमेस्ट्री पाहायला मिळतेय. या गाण्याची कोरिओग्राफी फारच भन्नाट झालीय. गणेश आचार्यनं यासाठी शाहरुखला खास सिग्नेचर स्टेप्स देऊ केल्यात आणि यावर किंग खान कमालीचा थिरकलाय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'लुट पुट गया' गाण्याच्या व्हिज्युअल्समध्ये 'डंकी' चित्रपटाच्या कथेचे सुंदर चित्रण दिसते. यामध्ये तापसी पन्नू साकारत असलेलं मनू हे पात्र आणि शाहरुख साकारत असलेलं हार्डी जगाच्या विरुद्ध उभ राहतं. हार्डीच्या मनात मनूबद्दल असलेल्या प्रेम भावनेचं रोमँटिक चित्रण गाण्यात करण्यात आलंय.
हा बहुप्रतीक्षित चित्रपट शाहरुख खान आणि राजकुमार हिराणी या यशस्वी स्टार आणि दिग्दर्शकाचा पहिलाच रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. यूके आणि कॅनडा सारख्या देशांमध्ये स्थलांतरित होण्यासाठी वाट्टेल त्या मार्गाचा वापर करणाऱ्या भारतीयांच्या खडतर प्रवासावर आधारित आहे. शाहरुख आणि तापसी पन्नूसोबत या चित्रपटात विकी कौशल, बोमन इराणी आणि विक्रम कोचर यांच्याही भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
2023 च्या सुरुवातीला पठाण आणि जवान सारख्या ब्लॉकबस्टरच्या यशानंतर शाहरुख खान आता 'डंकी' या चित्रपटासह ब्लॉकबस्टरची हॅट्रीक साधणार आहे. जिओ स्टुडिओज, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिराणी फिल्म्स द्वारे प्रस्तुत असलेला 'डंकी' हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी पडद्यावर झळकणार आहे. साऊथ स्टार प्रभास अभिनीत बहुप्रतिक्षित 'सालार' चित्रपटाच्या एक दिवस अगोदर 'डंकी' रिलीज होणार आहे. या दोन मोठ्या चित्रपटातील संघर्ष बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा-
1. एका सीनसाठी शाहरुखनं 25 वेळा केली रिहर्सल, 'डंकी'साठी किंग खानची मेहनत
2. सैनिकांना प्रेरणा देणाऱ्या 'सॅम बहादूर' चित्रपटातील 'बंदा' गाणं लॉन्च
3. वाढदिवसानिमित्त कार्तिक आर्यनला दिली करण जोहरनं भेट; केली चित्रपटाची घोषणा