ETV Bharat / entertainment

Dream Girl 2 box office collection day 5: 'ड्रीम गर्ल 2' रिलीजच्या पाचव्या दिवशी करेल 'इतकी' कमाई.... - ड्रीम गर्ल 2

आयुष्मान खुरानाचा चित्रपट 'ड्रीम गर्ल 2' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाच्या कमाई संदर्भात काही आकडे समोर आले आहेत. 'ड्रीम गर्ल 2' चित्रपट रूपेरी पडद्यावर किती नोटा छापू शकेल हे जाणून घेण्यासाठी वाचा...

Dream Girl 2
ड्रीम गर्ल 2
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2023, 4:45 PM IST

मुंबई : आयुष्मान खुरानाचा चित्रपट 'ड्रीम गर्ल 2' बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. आयुष्मान खुराना पुन्हा एकदा पूजा बनून थिएटरमध्ये वादळ निर्माण करत आहे. या चित्रपटात आयुष्मानने त्याच्या व्यक्तिरेखेसोबतच एका मुलीची भूमिकाही साकारली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या चित्रपटाला पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये खूप गर्दी होत आहे. आयुष्मान आणि अनन्याच्या 'ड्रीम गर्ल 2'ने बॉक्स ऑफिसवर 50 कोटीचा टप्पा ओलांडला आहे. 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट दुसऱ्या आठवड्याच्या दिवसातही चांगले कलेक्शन करत आहे. आयुष्मान खुराना पुन्‍हा एकदा पूजाच्‍या रुपात येऊन चाहत्‍यांची मने जिंकली आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'ड्रीम गर्ल 2'चे कलेक्शन : 'ड्रीम गर्ल 2' चे पाचव्या दिवसाचे कलेक्शनाचे अंदाजे आकडे समोर आले आहेत. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट पाचव्या दिवशी 5.50 कोटी कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 51.63 कोटी होईल. 'ड्रीम गर्ल 2'ने रविवारी सर्वाधिक कलेक्शन केले. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 10.69 कोटी, दुसऱ्या दिवशी 14.02 कोटी, तिसऱ्या दिवशी 16 कोटी आणि चौथ्या दिवशी 5.42 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे.

ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये होणार सामील : 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट येत्या काही दिवसात 100 कोटींचा आकडा बॉक्स ऑफिसवर पार करेल. 'ड्रीम गर्ल 2' हा 2023 च्या सर्वोत्कृष्ट ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये नक्की सामील होईल, असे सध्या दिसत आहे. 'ड्रीम गर्ल 2'बद्दल बोलायचे तर हा चित्रपट 2019 मध्ये आलेल्या 'ड्रीम गर्ल'चा सीक्वल आहे. 'ड्रीम गर्ल 2' चित्रपटात आयुष्मान खुराना, अनन्या पांडे, परेश रावल, विजय राज, अन्नू कपूर, अभिषेक बॅनर्जी, राजपाल यादव, मनजोत सिंग यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. 2023 हे वर्ष बॉलीवूडसाठी शुभ ठरले असून येत्या काही महिन्यांत बॉलीवूडमधील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकणार आहेत.

हेही वाचा :

Jawan Movie : 'जवान' चित्रपटाबद्दल शाहरुखच्या फॅन क्लबने केला खुलासा...

Rani Mukerji wedding pictures : आदित्य चोप्राशी दशकभरापूर्वी झालेल्या लग्नाचे फोटो शेअर करणार राणी मुखर्जी

Happy 3 soulmate: प्रतीक बब्बरने गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीसोबत साजरी केली उत्कठ प्रेमाची ३ वर्षे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.