मुंबई Dono Trailer out : अभिनेता सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर आणि पूनम ढिल्लॉनची मुलगी पलोमा 'दोनो' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. या चित्रपटासाठी राजवीर आणि पलोमा खूप उत्सुक आहे. राजश्री बॅनरखाली केलेल्या 'दोनो' चित्रपटाचा ट्रेलर 4 सप्टेंबरला प्रदर्शित झाला. राजश्री आणि जिओ स्टुडिओची निर्मिती हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये 5 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल. मुंबईत झालेल्या 'दोनो'च्या ट्रेलर लॉन्चला सनी देओलही उपस्थित होता. हा चित्रपट अवनीश एस बडजात्याने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचे ट्रेलर इंस्टाग्राम, यूट्यूब आणि ट्विटरवर शेअर करण्यात आले आहे. 'दोनो'चे ट्रेलर चाहत्यांना खूप पसंत पडले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'दोनो'चा ट्रेलर प्रदर्शित : 'दोनो'चा टायटल ट्रॅक जेव्हा रिलीज झाला होता, तेव्हा सलमान खान आणि भाग्यश्री पटवर्धनने इंस्टाग्राम अकाउंट शेअर करत या चित्रपटासाठी राजवीर आणि पलोमाला शुभेच्छा दिल्या होत्या. सलमान आणि भाग्यश्री या दोघांनीही आपल्या करिअरची सुरुवात 'मैने प्यार किया' मधून केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. या चित्रपटामध्ये सलमान आणि भाग्यश्रीची जोडी चाहत्यांनी खूप पसंत केली होती. दरम्यान 'दोनो'च्या ट्रेलरमध्ये राजवीर हा देवच्या पात्रामध्ये दिसत आहे, तर पलोमा ही मेघनाच्या भूमिकेत आहे. हे दोघे आपल्या मित्र आणि मैत्रिणीच्या लग्नात जातात आणि तिथेच या दोघांना प्रेम होते.
राजश्री प्रॉडक्शनचा 'दोनो' चित्रपट : गेल्या अनेक वर्षांमध्ये राजश्री प्रॉडक्शनने हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक नव्या कलाकांना संधी दिली आहे. देओल कुटुंबाच्या चाहत्यांच्या नजरा आता राजवीर देओलवर खिळल्या आहेत. राजकुमार बडजात्या आणि अजितकुमार बडजात्या यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. याशिवाय या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर सूरज बडजात्या आहेत. यापूर्वी सनी देओलने मोठा मुलगा करण देओलला 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून लॉन्च केले होते, मात्र हा चित्रपट फारसा यशस्वी झाला नाही. दरम्यान आता सनी देओल पुन्हा एकदा करण देओलला लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.
हेही वाचा :
- Dream girl २ box office collection day ११ : आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर 'ड्रीम गर्ल 2' बॉक्स ऑफिसवर करत आहे जादू...
- Kushi BO Collection Day 2: विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू स्टारर 'खुशी'ने केली बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई....
- chandramukhi 2 trailer released : कंगना रणौतच्या आगामी 'चंद्रमुखी 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज...