मुंबई - आरआरआर चित्रपटामधील नाटt नाटू गाण्याने जागतिक चित्रपट उद्योगातील प्रतिष्ठित ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. काल भैरव आणि राहुल सिपलीगंज या गायकांच्या गायनाने कीरावणीच्या अप्रतिम सुरांना साथ दिली आणि या गाण्याने अनेक रेकॉर्ड तोडले. दिग्दर्शक राजामौली यांनी हे गाणे चित्रित करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचे अनेक मुलाखतींमध्ये सांगितले. नाटू नाटू गाण्यातील एनटीआर आणि राम चरण यांच्या अफलातून डान्सच्या मागे असलेले लोकेशन खूप प्रभावी वाटले. अनेकांना हा सेट असावा असेच वाटले होते. मात्र हा सेट नसून पक्की इमारत आहे, ज्याच्यासमोर या गाण्याचे शुटिंग पार पडले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
नाटू नाटू गाण्यात दिसणारी इमारत खरी आहे. ही युक्रेनची अध्यक्षीय इमारत आहे. त्याला मारिन्स्की पॅलेस म्हणतात. राजवाड्याच्या पुढे युक्रेनच्या संसदेची इमारत आहे. मारिंस्की पॅलेस युक्रेनची राजधानी कीवमध्ये डनिप्रो नदीच्या काठावर हा भव्य राजवाडा उभा आहे. रशियन सम्राज्ञी एलिझावेटा पेट्रोव्हना यांच्या आदेशानुसार 1744 मध्ये हा राजवाडा बांधण्यात आला होता. या राजवाड्याचे बांधकाम 1752 मध्ये पूर्ण झाले. त्या वेळी रशियन साम्राज्यातील सर्वात प्रसिद्ध वास्तुविशारद बार्टोलोमियो रास्ट्रेली यांनी या महालाचे मुख्य वास्तुविशारद म्हणून काम केले होते. दुसऱ्या महायुद्धात राजवाड्याचे नुकसान झाले होते... 1940 च्या उत्तरार्धात त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. 1980 च्या दशकात पुन्हा एकदा राजवाड्याचे नूतनीकरण करण्यात आले
अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या राजवाड्याच्या परिसरात नाटू नाटू गाण्याचे चित्रीकरण हे चित्रपटाचे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. राजामौली यांनी एका प्रसंगी सांगितले की युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे एकेकाळी टेलिव्हिजन अभिनेता होते आणि त्यांनी गाणे चित्रित करण्यास परवानगी दिली. हे त्यांचे नशीब असल्याचे ते म्हणाले. पण फक्त गाण्याव्यतिरिक्त आरआरआर चित्रपटातील काही प्रमुख दृश्ये येथे शूट करण्यात आली होती. या शुटिंगनंतर काही महिन्यांनी रशियाने युक्रेनवर युद्ध घोषित केले. विशेष म्हणजे अलिकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी युक्रेन दौऱ्यात या मारिंस्की पॅलेसला भेट दिली होती.
हेही वाचा - Naatu Naatu Oscars 2023 : आरआरआरमधील नाटू नाटूला ऑस्कर पुरस्कार, देशभर जल्लोष