मुंबई - Parineeti Chopra First Diwali After Marriage : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री परिणीती चोप्रानं आम आदमी पक्षाचे निलंबित नेते खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत राजस्थानमधील उदयपूर येथे लग्न केले. त्यांचा विवाहसोहळा हा खूप भव्य होता. त्यानंतर तिनं लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले होते. दरम्यान ती तिच्या पतीसोबत पहिली दिवाळी साजरी करणार आहे. तिनं एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती केशरी सूट घालून आहे. या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
परिणीतीने दिवाळीची तयारी सुरू केली : लग्नानंतर परिणीती एक-दोनदा मुंबईत तिच्या माहेरी गेली होती आणि आता ती दिल्लीत तिच्या सासरच्यांकडे राहते. तिनं तिचा पहिला करवा चौथ साजरा केल्यानंतर, ती तिच्या सासरच्या घरी पहिल्या दिवाळीच्या सेलिब्रेशनची तयारी करत आहे. इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये, तिनं केशरी रंगाचा सूटसह कानातले, बांगड्या आणि ग्लॅमरस मेकअप लूक केला आहे. याशिवाय तिच्या हातावर मेंहदी आणि लाल सिंदूर आहे. फोटो शेअर करत तिनं इंस्टाग्राम अकाउंटवर लिहलं, 'दिवाळी सुरू झाली आहे'. तिच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत तिचे कौतुक करताना दिसत आहे.
करवा चौथचे फोटो : अलीकडेच परिणीतीनं तिचा पहिला करवा चौथ पती राघव चढ्ढासोबत साजरा केला, ज्याचे फोटो तिनं सोशल मीडियावर पोस्ट केले होते. करवा चौथला परिणीती लाल रंगाच्या सूटमध्ये खूप सुंदर दिसत होती. फोटोसोबत तिनं 'हॅपी फर्स्ट करवा चौथ माय लव्ह' असं कॅप्शन लिहलं होतं. परिणीती आणि राघव चड्ढा यांच डेस्टिनेशन वेडिंग झाले होते. या लग्नात गीता बसरा, मनीष मल्होत्रा, हरभजन सिंग, सानिया मिर्झासह अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह राजकीय नेत्यांनीही लग्नाला उपस्थिती दर्शवली.
हेही वाचा :