मुंबई - अभिनेत्री दिशा पटानी आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ यांच्यात खूप चांगलं मैत्रीचं नातं आहे. या दोघी अनेकदा रेस्टॉरंट्समध्ये एकत्र दिसतात. मुंबईतील एका रेस्टरंटमध्ये डिनरसाठी भेटलेल्या या जीवलग मैत्रीणी हॉटेलमधून हातात हात घालून बाहेर पडताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.
कॅज्युअल आउटिंगसाठी दिशा पटानीनं राउंड-नेक टीसह पेअर केलेला डेनिम शॉर्ट्स परिधान केला होता. काळ्या स्नीकर्ससह, हलका मेकअप करुन कर्ली केसांसह तिनं आपला लूक पूर्ण केला. यावेळी जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफनं हिरवी-चेकर्ड पॅंट आणि पांढरा ऑफ-शोल्डर क्रॉप टॉप परिधान केला होता. हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर दोघी मिळून त्यांच्या आलिशान कारकडे निघून गेल्या.
दिशा पटानी आणि कृष्णा श्रॉफ यांची मैत्री खूप काळापासूनची आहे. दोघीही एकमेकींच्या सर्व प्रसंगात साथ देत असतात. मधल्या काळात दिशाचं नाव कृष्णाचा भाऊ टायगरशी जोडलं जात होतं. त्यावेळीही कृष्णा दिशाच्या पाठीशी ठामपणे उभी होती. कृष्णाची आईही दिशासाठी नेहमी प्रोत्साहन देत असते. तिच्या फोटो आणि व्हिडिओवर ती नेहमी आपली प्रतिक्रिया देत असते.
दिशा पटानी महेंद्रसिंग धोनीच्या 'धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या बायोग्राफिकल स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात धोनीच्या माजी मैत्रिणीच्या भूमिकेत दिसली होती. दिशा पटानीच्या अभिनय कारकिर्दीत 'बागी 2',' भारत', 'मलंग' आणि 'एक व्हिलन रिटर्न्स' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. सध्या ती प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'कल्की 2898 एडी' या द्विभाषिक चित्रपटात काम करत आहे. याशिवाय दिशा पटानी सागर आंब्रे दिग्दर्शित आणि सिद्धार्थ मल्होत्राची मुख्य भूमिका असलेल्या 'योद्धा' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात झळकणार आहे. हा रोमांचक चित्रपट पुढील वर्षी 15 मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल होईल. दिशाने ‘लोफर’ या चित्रपटाद्वारे साऊथ इंडियाच्या फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला आहे. सध्या, ती बॉबी देओलच्या तामिळ पदार्पणाच्या 'कांगुवा' या तमिळ भाषेतील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये गुंतली आहे.
हेही वाचा -
1. सोनम कपूरच्या पार्टीत डेव्हिड बेकहॅम, किंग खानच्या मन्नत बंगल्यातही लावली हजेरी
2. संक्रांतीला रिलीज होणार कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीचा 'मेरी ख्रिसमस'
3. Koffee With Karan 8: करणच्या चॅट शोमध्ये 'नणंद भावजयी'ची जोडी : रॅपिड फायर प्रश्नांनं उडवली धमाल