मुंबई : प्रभास आणि क्रिती सेनॉन स्टारर 'आदिपुरुष' या चित्रपटाबाबत दिवसेंदिवस वाद वाढत आहे. आदिपुरुष या चित्रपटातील काही संवाद हा प्रेक्षकांच्या गळ्यातून उतरत नाही आहे. त्यामुळे चित्रपट निर्माते ओम राऊत आणि चित्रपटाचे संवाद लिहिणारे लेखक मनोज मुंतशीर यांच्या विरोधात सर्वत्र द्वेषाचे वातावरण निर्माण झाले आहे. 1988 मध्ये आलेल्या रामानंद सागर यांच्या रामायणातील 'राम' फेम अभिनेते अरुण गोविल आणि लक्ष्मण सुनील लाहिरी यांनीही या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, रामायणातील सीता बनलेली अभिनेत्री दीपिका चिखलियाने पुन्हा एकदा माता सीताचे अवतार धारण करून आपला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. चाहत्यांनी पुन्हा एकदा दीपिका चिखलियाला सीतेच्या रूपात स्वीकारले आहे आणि आदिपुरुषमध्ये सीतेच्या भूमिकेत क्रिती सेनॉनपेक्षा तिचे अधिक जास्त कौतुक केले जात आहे.
चाहत्यांच्या मागणीनुसार दीपिका बनली सीता : सोशल मीडियावर सीता म्हणून तिचा व्हिडिओ शेअर करत दीपिकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, चाहत्यांच्या मागणीनुसार... माझ्या भूमिकेसाठी मला नेहमीच प्रेम मिळाले याबद्दल मी कृतज्ञ आहे... मी... सीताजीची भूमिका.. विचारू शकले नाही. दीपिकाला चाहत्यांनी सीतेच्या रूपात तिला स्वीकारले आहे आणि ते क्रिती सेनॉनला नापसंत करत आहेत.
दीपिका चिखलिया बनली पुन्हा एका माता सीता : दीपिका चिखलिया 1988 मध्ये प्रसारित झालेल्या रामानंद सागर यांच्या रामायणमध्ये त्या माता सीतेच्या भूमिकेत दिसल्या होत्या. हा शो आजही लोकांच्या मनावर राज्य करतो. या शोमध्ये अरुण गोविलने रामची भूमिका केली होती आणि सुनील लाहिरीने लक्ष्मणची भूमिका केली होती, जी अजूनही हिट आहे. दुसरीकडे, आदिपुरुष या चित्रपटात संवाद हा चुकीच्या पद्धतीने लिहल्या गेल्याने प्रेक्षक आपला रोष हा सोशल मीडियावर दाखवत आहे. शिवाय या चित्रपटासाठी जनता चित्रपट निर्मात्यांना माफ करत नाही आहे. तसेच या चित्रपटात राघवच्या भूमिकेत प्रभास, लंकेशच्या भूमिकेत सैफ अली खान आणि जानकीच्या भूमिकेत क्रिती सॅनन आहे. या चित्रपटाची वाट प्रेक्षक फार आतुरतेने पाहत होते मात्र सध्याला या चित्रपटाचा विरोध केल्या जात आहे.
हेही वाचा :