ETV Bharat / entertainment

Dil Ka Telephone 2.0 Released : आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर 'ड्रीम गर्ल २'चे पहिले ट्रॅक प्रदर्शित... - Dream Girl 2

'ड्रीम गर्ल २' या चित्रपटामधील पहिले गाणे ‘दिल का टेलिफोन २.०’ रिलीज झाले आहे. आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांची जबरदस्त केमिस्ट्री या गाण्यात पाहायला मिळत आहे.

Dil Ka Telephone 2.0 Released
दिल का टेलिफोन २.० गाणे रिलीज
author img

By

Published : Aug 10, 2023, 5:54 PM IST

मुंबई : 'ड्रीम गर्ल २' या चित्रपटामधील ‘दिल का टेलिफोन २.०’ हे गाणे रिलीज झाले आहे. आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडेची रंगतदार केमिस्ट्री या चित्रपटामध्ये दाखविण्यात येणार आहे. 'ड्रीम गर्ल २' चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा आयुष्मान प्रेक्षकांना हसविण्यासाठी येत आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ड्रीम गर्ल' चित्रपटामुळे हसून हसून प्रेक्षकांच्या पोटात दुखायला लावले होते. आज चार वर्षांनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होत आहे. त्याचबरोबर या चित्रपटात नुसरत भरुचाच्या जागी आता अनन्या पांडेला घेण्यात आले आहे. आयुष्मान आणि अनन्या पांडे स्टारर चित्रपट 'ड्रीम गर्ल २' रिलीजसाठी सज्ज आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'ड्रीम गर्ल २'चे गाणे : ‘दिल का टेलिफोन २.०’ या गाण्याला संगीत मीट ब्रदर्सने दिले आहे. याशिवाय हे गाणे जोनिता गांधी आणि जुबिन नौटियालने मीट ब्रदर्सच्या सहकार्याने गायले आहे. त्याचबरोबर या गाण्याचे बोल कुमार यांनी लिहिले आहे. आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे या चित्रपटासाठी प्रसिद्धीझोतात आले आहेत, कारण दोघेही 'ड्रीम गर्ल २'मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. याच्यासोबत या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी, परेश रावल, विजय राज, मनजोत सिंग, राजपाल यादव, सीमा पाहवा, मनोज जोशी, अन्नू कपूर आणि असरानी यांसारख्या स्टार्स देखील आहेत. त्यामुळे यावेळी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन होईल हे नक्कीच.

आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडेची कलरफुल केमिस्ट्री : या गाण्यात आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांची कलरफुल केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. राज शांडिल्य दिग्दर्शित आणि एकता कपूर आणि शोभा कपूर निर्मित, 'ड्रीम गर्ल २' हा सिनेमाचा एक भव्य उत्सव आहे, असे आयुष्मानने सांगितले आहे. म्हणून कॅलेंडरमध्ये २५ ऑगस्ट २०२३ तारीख चिन्हांकित करा आणि चित्रपटासह मजेदार प्रवासाचा आनंद घ्या. ‘दिल का टेलिफोन २.०’ च्या कॉलला आत्ताच उत्तर देण्यासाठी सज्ज व्हा. असे म्हटले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करेल असे दिसत आहे.

हेही वाचा :

  1. Gadar 2 vs OMG 2: 'गदर २' आणि 'ओ माय गॉड २'मध्ये होणार बॉक्स ऑफिसवर टक्कर
  2. Thank You For Coming Movie : भूमी पेडणेकर आणि शहनाज गिल स्टारर 'थँक यू फॉर कमिंग'चे पोस्टर प्रदर्शित...
  3. Dhanush catches Jailer FDFS : धनुषने पाहिला 'जेलर'चा पहिला शो, फॅन्सचा सोशल मीडियावर जल्लोष सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.