मुंबई - Farhan akhtar : फरहान अख्तरनं 'दिल चाहता है' या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटाला 23 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनं गोव्यातील चापोरा किल्ल्याला जाऊन भेट दिली आहे. 'दिल चाहता है' चित्रपटातील बहुतांश दृश्ये लोकांच्या मनात घर करून आहेत. या चित्रपटामधील एका किल्ल्याचं प्रतिकात्मक दृश्य आहे. तिघे मित्र बसून त्याच्या आयुष्याबद्दल बोलतात. 'दिल चाहता है' चित्रपटामध्ये तीन मित्रांचा प्रवास दाखविण्यात आला आहे. 90 च्या दशकातील हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटामध्ये आकाश मल्होत्रा, समीर मूलचंदानी आणि सिद्धार्थ सिन्हाची यांची भूमिका अनुक्रमे आमिर खान, सैफ अली खान, अक्षय खन्ना यांनी साकारल्या होत्या. या चित्रपटामधील गाणी देखील खूप हिट झाली होती. हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता.
फरहान अख्तरनं फोटो केला शेअर : अभिनेता-चित्रपट निर्माता फरहान अख्तरला या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली होती. दरम्यान आता या खास प्रसंगी फरहानं इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये फरहान गोव्यातील चापोरा किल्ल्याच्या भिंतीवर लेखक शुजात सौदागर यांच्यासोबत बसलेला आहे. ही तीच जागा आहे, जिथे तिघे मित्र बसून आयुष्याबद्दल बोलतात. हा फोटो आता सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या फोटोला अनेकजण पसंत करत आहेत. एका यूजरनं या फोटोवर कमेंट करत लिहिल, ''मला गोवा खूप आवडते हा फोटो खूप चांगला आहे''. दुसऱ्या एकानं लिहिलं , ''मला इथे जायचं आहे'.' त्यानंतर आणखी एकानं लिहिलं, ''हा चित्रपट आणि हे दृश्य खूपच सुंदर आहे'. अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
23 वर्षांनंतर 'दिल चाहता है' चित्रपट करते चाहत्यांच्या मनावर राज्य : हा फोटो शेअर करताना फरहाननं लिहिलं की, ''आकाश, सिड आणि समीर यांच्या आयुष्यावर बोलत असलेल्या चित्रीकरणानंतर मी पहिल्यांदाच चापोरा किल्ल्यावर परतलो आहे. 23 वर्षानंतर बरेच काही बदलले आहे. पण गोव्याची उबदार, समुद्री मीठानं भरलेली हवा तशीच आहे. काही ठिकाणे अगदी जादुई असतात''. फरहानचा हा फोटो हृदयस्पर्शी आहे. हा फोटो पाहून फरहान अख्तरची पत्नी शिबानीनं लिहिलं, 'जादुई फ्रेममध्ये माझे 2 आवडते लोक.' याशिवाय हर्षवर्धन कपूरनं काही गोष्टी कायमच्या असतात, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा :