ETV Bharat / entertainment

Amazing look of Dharmendra : धर्मेंद्र साकारणार शेख सलीम चिस्तीची व्यक्तीरेखा, फर्स्ट लूक पाहून चाहते अवाक - शेख सलीम चिस्ती

70 आणि 80 च्या दशकातील सुपरस्टार धर्मेंद्र आगामी ताज डिव्हाइड बाय ब्लड या चित्रपटाद्वारे डिजिटल पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने सोशल मीडियावर 'शेख सलीम चिश्ती' म्हणून त्याचा पहिला लूक शेअर केला आहे. या ऐतिहासिक चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि अदिती राव हैदरी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Feb 15, 2023, 5:37 PM IST

मुंबई - 70 आणि 80 च्या दशकातील सुपरस्टार धर्मेंद्र लवकरच एका वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. धर्मेंद्र त्याच्या आगामी वेब सिरीज 'ताज-डिव्हाइड बाय ब्लड' द्वारे OTT वर पदार्पण करणार आहे. अलीकडेच धर्मेंद्रने सोशल मीडियावर त्याचा फर्स्ट लूक शेअर केला आहे, ज्यामध्ये तो शेख सलीम चिश्तीच्या गेटअपमध्ये दिसत आहे. हा फर्स्ट लुक शेअर करताना धर्मेंद्रने त्याच्या चाहत्यांकडून त्याच्या वेब सीरिजसाठी शुभेच्छा मागितल्या आहेत.

  • Friends, i am playing Shaikh Slim Chishti ….a sufi saint, in film Taaj. A small but an important role………need your good wishes 🙏 pic.twitter.com/IQpAoaS67y

    — Dharmendra Deol (@aapkadharam) February 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

धर्मेंद्र यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर 'ताज-डिव्हाइड बाय ब्लड' या आगामी वेब सिरीजमधील त्याचा पहिला लूक शेअर केला आहे. लांब ड्रेस, पगडी आणि लांब पांढरी दाढी यामध्ये धर्मेंद्रचा लूक पूर्णपणे वेगळा दिसत आहे. या मालिकेत धर्मेंद्र शेख सलीम चिश्ती ही व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे. त्याचबरोबर नसीरुद्दीन शाह शोमध्ये अकबरच्या भूमिकेत दिसणार आहे.

ट्विटरवर त्याचा फर्स्ट लूक शेअर करताना धर्मेंद्रने लिहिले की, 'मित्रांनो, मी ताज चित्रपटात शेख स्लिम चिश्ती या सुफी संताची भूमिका साकारत आहे. ती एक छोटीशी पण महत्त्वाची भूमिका आहे. तुमच्या शुभेच्छांची गरज आहे.' दुसऱ्या ट्विटवर धर्मेंद्र यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'आणखी एक रूप. मला आशा आहे कि तुम्हाला हे आवडेल.' धर्मेंद्रचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. एका ट्विटर युजरने पोस्टच्या कमेंटमध्ये लिहिले की, 'धरम पाजी, एका धार्मिक व्यक्तिरेखेचा कहर केला आहात.' त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, 'धरम जी, हा लूक पाहून मला क्रोधी चित्रपटाची आठवण झाली.'

'ताज-डिव्हाइड बाय ब्लड' कास्ट 'ताज-डिव्हाइड बाय ब्लड' हा एक पीरियड ड्रामा आहे, ज्यामध्ये मुघल साम्राज्याची ओळख करून देण्यात आली आहे. या मालिकेत धर्मेंद्र व्यतिरिक्त नसीरुद्दीन शाह, आदिती राव हैदरी, शुभम कुमार मेहरा, आशिम गुलाटी हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यात आदिती राव हैदरी 'अनारकली'च्या भूमिकेत, आशिम गुलाटी 'राज कुमार सलीम'च्या भूमिकेत, ताहा शाह 'राज कुमार मुराद'च्या भूमिकेत, शुभम कुमार मेहरा 'राज कुमार दनियाल'च्या भूमिकेत, संध्या मृदुल 'राणी जोधाबाई'च्या भूमिकेत आणि झरिना वहाब 'राणी सलीमा'च्या भूमिकेत दिसणार आहेत

धर्मेंद्रच्या वर्क फ्रंट - 'ताज-डिव्हाइड बाय ब्लड' या या शो व्यतिरिक्त धर्मेंद्र यांच्याकडे करण जोहरच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपटातही आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्याही भूमिका आहेत. 28 जुलै रोजी रिलीज होत आहे.

हेही वाचा - Kartik Aaryans Expectations From His Partner : कार्तिक आर्यनला हवी आहे अशी जोडीदार, पहिल्यांदाच केला खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.