ETV Bharat / entertainment

Dharmendra Health : बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी अमेरिकेला रवाना - Dharmendra धर्मेंद्र

Dharmendra Health : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र हे आजारी आहेत. अभिनेता सनी देओल त्यांना उपचारासाठी अमेरिकेला घेऊन गेला आहे.

Dharmendra
Dharmendra
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2023, 11:08 PM IST

Updated : Sep 11, 2023, 11:19 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या त्याच्या 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानं आतापर्यंत तब्बल ५१० कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाच्या उत्सवाच्या वातावरणात त्याचे वडील धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली. धर्मेंद यांच्या निकटवर्तीयांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या माहितीनुसार, सनी देओल वडील धर्मेंद्र यांना उपचारासाठी अमेरिकेला घेऊन गेला आहे. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी विजिता देखील अमेरिकेत गेली आहे.

धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली : धर्मेंद यांच्या निकटवर्तीयांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या माहितीनुसार, सनी देओल धर्मेद्र यांना घेऊन २० दिवस अमेरिकेत राहणार आहे. धर्मेंद्र यांना आरोग्याशी संबंधित काही समस्या आहेत. त्यांच्यावर १५ ते २० दिवस उपचार सुरू राहणार आहेत. मात्र काळजी करण्याची काही आवश्यकता नाही, सर्व काही ठीक आहे.

  • 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये दिसले होती : धर्मेंद्र नुकतेच करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसले होता. या चित्रपटात धर्मेंद्र शबाना आझमीसोबत रोमान्स करताना दिसले. या चित्रपटातील दोघांच्या किसिंग सीननं खळबळ उडवून दिली होती. धर्मेंद्रनं यात रणवीर सिंहच्या आजोबांची भूमिका साकारली होती.

सनी देओलची कारकीर्द : बॉलिवूड अभिनेता सनी देओल नुकताच गदर २ या चित्रपटात दिसला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटातील तारा सिंग या त्याच्या भूमिकेला खूप पसंती मिळाली आहे. गदर 2 हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे. तब्येत बिघडल्यामुळे अभिनेते धर्मेद्र यांना उपचारासाठी अमेरिकेत नेण्यात आले आहे. वयाच्या ८७ वर्षीही फिटनेस सांभाळणारे सदाबहार अभिनेता धर्मेंद्र हे रॉकी आणि राणीमधील भूमिकेमुळे चर्चेत आले होते. या चित्रपटात त्यांनी ७३ वर्षाच्या शबाना आझमींबरोबरील चुंबनदृष्य चांगलेच गाजले. धर्मेंद्र यांच्याबरोबर त्यांचा मुलगा अभिनेता सनी देओल आणि मुलगी विजिता असल्याचेही देओल यांच्या कुटुंबातील निकटवर्तीयांनी ईटीव्ही भारतला माहिती सांगितली.

हेही वाचा :

  1. Pooja Bhatt And Shah Rukh Khan : पूजा भट्टनं वडील महेश भट्टसोबतच्या किसबद्दल केला खुलासा; शाहरुख खाननं दिली होती 'ही' प्रतिक्रिया...
  2. Pushpa 2 : 'पुष्पा राज बॉक्स ऑफिस जिंकण्यासाठी परत येत आहे ; 'पुष्पा 2'ची रिलीज डेट जाहीर...
  3. AR Rahman : चेन्नई लाईव्ह कॉन्सर्टबाबत चाहत्यांनी केली तक्रार ; संगीतकार ए.आर. रहमानचं ट्विट झालं व्हायरल...

Last Updated : Sep 11, 2023, 11:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.