ETV Bharat / entertainment

Dhanush in Illaiyaraaja biopic : इलाईराजा यांच्या बायोपिकमध्ये झळकणार साऊथचा सुपरस्टार धनुष - बायोपिक

Dhanush in Illaiyaraaja biopic : साऊथचा सुपरस्टार धनुष हा इलाईराजा यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग पुढील वर्षी 2024 मध्ये सुरू होणार आहे.

Dhanush
धनुष
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 3:13 PM IST

मुंबई - Dhanush in Illaiyaraaja biopic : साऊथचा सुपरस्टार धनुषनं हिंदी चित्रपटसृष्टीतमध्ये आपल्या अभिनयाची एक छाप सोडली आहे. त्याचे हिंदी पट्यात अनेक चाहते आहेत. दरम्यान आता धनुषच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. धनुष हा राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार, अरेंजर, ऑर्केस्ट्रेटर, गीतकार आणि गायक इलाईराजा यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. धनुषच्या या आगामी चित्रपटाचं शूटिंग पुढील वर्षी 2024 मध्ये सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे.

बायोपिकमध्ये धनुष पहिल्यांदा दिसणार : धनुष अभिनय करत असलेला हा बायोपिक राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार, इलाईराजा यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये तो इलाईराजा यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट कनेक्ट मीडिया, साऊथ स्टार मोहनलाल आणि वृषभ मिळून संयुक्तपणे तयार करणार आहेत. अलीकडेच युवन शंकर राजानं सांगितले होते की, त्याला वडील इलाईराजा यांच्या बायोपिकमध्ये धनुषला पाहायला आवडेल. धनुष पहिल्यांदाच बायोपिकमध्ये दिसणार आहे. धनुष हा स्वतः इलाईराजाचा खूप मोठा चाहता आहे आणि ही भूमिका मिळणे त्यासाठी स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. याबद्दल निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र सध्या या चित्रपटाबाबत चर्चा सुरू आहे.

इलाईराजा बद्दल : 80 वर्षीय इलाईराजा यांनी आपल्या संगीत कारकिर्दीत 1000 चित्रपटांसाठी 7 हजार गाणी रचली आहेत. याशिवाय त्यांनी 20 हजारांहून अधिक मैफिलीत सादरीकरण केले आहे. 1976 साली आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या या ज्येष्ठ संगीतकारानं फक्त तामिळच नाही तर तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी चित्रपटांसाठीही गाणी रचली आहेत. तसेच त्यांनी इंग्रजी चित्रपटासाठीही गाणी रचली आहे. 2010 मध्ये, त्यांना पद्मभूषण आणि भारताचा तिसरा सर्वोच्च सन्मान पद्मविभूषण (2018) देण्यात आला होता. इलाईराजा यांनी पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले आहेत, त्यापैकी तीन संगीत दिग्दर्शनासाठी आणि दोन बॅकग्राउंड स्कोरससाठी जिंकले आहेत. याशिवाय त्यांना रॉयल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा लंडननं 'उस्ताद' ही पदवी दिली आहे.

हेही वाचा :

  1. Salman And Cristiano Ronaldo : सलमान खान आणि क्रिस्टियानो रोनाल्डोचा फोटो व्हायरल, सौदी अरेबियात झाली भेट
  2. Varun Tej-Lavanya Tripathi wedding: वरुण तेज आणि लावण्याच्या कॉकटेल पार्टीत रामचरणसह अल्लु अर्जुनची धमाल
  3. Ankita Lokhande broke silence : सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअपच्या विषयावर अंकिता लोखंडेनं सोडलं मौन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.