ETV Bharat / entertainment

Dhak Dhak trailer out: 'धक धक'चा कडक ट्रेलर रिलीज, महिलांचं जीवन बदलणारा प्रवास सुरू - पंकज त्रिपाठी आणि पार्वती थिरुवथु

Dhak Dhak trailer out: 'धक धक' चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर सोमवारी रिलीज करण्यात आला. फातिमा सना शेख, रत्ना पाठक शाह दिया मिर्झा आणि संजना सांघी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 13 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2023, 1:07 PM IST

मुंबई - Dhak Dhak trailer out: तमाम चाहते आतुरतेने वाट पाहत असलेल्या 'धक धक' चित्रपटाचा ट्रेलर अखेर सोमवारी लॉन्च करण्यात आला. या चित्रपटाची निर्मिती वायकॉम 18 ने प्रांजल खंडडियाच्या आउटसाइडर फिल्म्स आणि बीएलएम पिक्चर्सने संयुक्तपणे केली आहे. जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या चार महिलांच्यावर या चित्रपटाचे कथानक बेतलेलं आहे. या चार महिला भावना, साहस आणि आत्म-शोधाच्या विलक्षण प्रवासासाठी दिल्ली ते खारदुंग असा प्रवास मोटर सायकलवरुन करतात. या प्रवासाने त्यांचे नशीब कायमचं कसं बदललं हे या चित्रपटात दाखवण्यात आलंय.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

याआधी गेल्या शुक्रवारी धक धक चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'रे बंजारा' हे शीर्षक गीत रिलीज केले होते. फातिमा सना शेखने तिच्या सोशल मीडिया हा टायटल ट्रॅक पोस्ट केला होता. दोन चाकं, कधीही न संपणारा रस्ता आणि अविस्मरणीय आठवणी, असं कॅप्शन तिनं रे बंजाराच्या व्हिडिओ पोस्टला दिलं होतं. धक धक चित्रपटाचा टायटल ट्रॅक आऊट झाला असून हा चित्रपट 13 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार. असल्यांचही तिने लिहिलं होतं.

'धक धक' चित्रपटाचा ट्रेलर खूपच रंजक दिसत आहे. चार घरच्या चौघी एका ध्येयासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करत एकत्र येतात आणि खऱ्या अर्थानं स्वतःच आयुष्य बदलून टाकणाऱ्या प्रवासाला निघताना दिसतात. कथेची मांडणी अतिशय उत्कंठा वाढवणारी असल्याचं ट्रेलरमध्ये स्पष्ट दिसतंय. फातिमा सना शेख, रत्ना पाठक शाह दिया मिर्झा आणि संजना सांघी यांच्या भूमिकाही या चित्रपटामुळे संस्मरणीय ठरणार आहेत, याची खात्री ट्रेलर पाहून वाटते.

'धक धक' या आगामी चित्रपट व्यतिरिक्त, फातिमा सना शेख आगामी 'मेट्रो इन दिनो' या अनुराग बसू दिग्दर्शित चित्रपटातही दिसणार आहे. ती मेघना गुलजारच्या आगामी चित्रपट 'सॅम बहादूर'मध्ये विकी कौशल आणि सान्या मल्होत्रासोबतही दिसणार आहे. दुसरीकड अभिनेत्री संजना संघी 'पिंक' फेम दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित अद्याप शीर्षक नसलेल्या हिंदी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी आणि पार्वती थिरुवथु यांच्याही भूमिका आहेत. यामध्ये पंकज त्रिपाठी संजनाच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा -

  1. Amazon And Flipkart Big Sale 2023 :ऑनलाईन शॉपिंगवर अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसह इतर साइटस् देणार 'इतकी' सूट ; महाऑफर सुरू...

2. Cricket World Cup: अनुष्का शर्मानं विराटला अर्पण केलं हृदय, तर आथिया शेट्टीनं केलं राहुलचं कौतुक

3. Mandali Official Teaser Out : रामलीला कलाकारांचं खरं आयुष्य उलगणाऱ्या 'मंडली'चा टीझर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.