ETV Bharat / entertainment

दीपिका पदुकोणचं 'फायटर' चित्रपटामधील फर्स्ट लूक पोस्टर रिलीज - Deepika Padukone

Deepika Padukone Fighter: 'फायटर' चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज चित्रपटातील दीपिका पदुकोणचं फर्स्ट लूक पोस्टर शेअर केलं आहे. गेल्या सोमवारी, निर्मात्यांनी हृतिकची पहिली झलक रिलीज केली होती.

Deepika Padukone Fighter
दीपिका पदुकोण फायटर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 4:38 PM IST

मुंबई - Deepika Padukone Fighter : अभिनेता हृतिक रोशनचा मोस्ट अवेटेड 'फायटर' चित्रपटाबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे. 'फायटर' निर्मात्यांनी हृतिक रोशनचा जबरदस्त फर्स्ट लूक शेअर केल्यानंतर आता दीपिका पदुकोणची पहिली झलक रिलीज केली आहे. दीपिका पहिल्यांदा पायलट लूकमध्ये रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. तिचा फर्स्ट लूक चाहत्यांना खूप पसंत पडला आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून दीपिकाच्या फर्स्ट लूकची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. शाहरुख खानसोबत अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसलेली दीपिका पुन्हा एकदा वेगळ्या अवतारात पडद्यावर आग लावण्यासाठी सज्ज झाली आहे.

'फायटर'मधील दीपिका पदुकोणचा फर्स्ट लूक : दीपिका पायलटच्या भूमिकेत खूप खास दिसत आहे. खाकी पोशाखात चष्मा घातलेली दीपिकाचा इंटेन्स लूकनं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. 'फायटर' चित्रपटात, ती स्क्वॉड्रन लीडर मीनल राठोडची भूमिका साकारणार आहे असून तिचं टोपणनाव मिनी असणार आहे. दीपिका ही हृतिकसोबत एअर ड्रॅगन युनिटमध्ये असेल. या चित्रपटामधील हृतिकचं फर्स्ट लूक पाहून चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं होतं. 'फायटर'चं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदनं केलं आहे. या बिग बजेट चित्रपटाचा टीझर लवकरच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होईल.

दीपिका पदुकोणचा वर्क फ्रंट : 'फायटर'मधील दीपिकाचा फर्स्ट लूक पाहून अनेकजण तिचही कौतुक करत आहेत. एका यूजरनं तिच्या फर्स्ट लूक पोस्टवर लिहिलं की, "तिचा लूक खूपच जबरदस्त आहे." दुसऱ्या एकानं म्हटलं, "खूप अप्रतिम दिसत आहे." आणखी एका यूजरनं म्हटलं की, ''दीपिका युनिफॉर्ममध्ये किलर दिसत आहे.'' दीपिकाची हृतिकसोबतची ही पहिलीच ऑन-स्क्रीन जोडी आहे. दीपिका पदुकोणच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती सायन्स-फिक्शन अ‍ॅक्शन चित्रपट 'कल्की 2898 एडी'मध्ये प्रभाससोबत दिसणार आहे. पुढं ती 'द इंटर्न'मध्ये चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत दिसेल. याशिवाय तिचा 'सिंघम 3' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केलं आहे.

हेही वाचा :

  1. 'अ‍ॅनिमल' चित्रपटासाठी रणबीर कपूरनं वाढवलं 11 किलो वजन, पाहा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन
  2. डंकी ड्रॉप 4 एक्स रिव्ह्यू : शाहरुख आणि हिराणीचा जयजयकार, किंग खानच्या हॅट्रीकची फॅन्सना खात्री
  3. 'अ‍ॅनिमल' आणि 'सॅम बहादुर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या पाचव्या दिवशी करणार 'इतकी' कमाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.