ETV Bharat / entertainment

दीपिका पदुकोण 38व्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी रणवीर सिंगसोबत गेली डिनर डेटवर - व्हिडिओ व्हायरल

Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पदुकोणनं 5 जानेवारी रोजी 38वा वाढदिवस साजरा केला असून या विशेष प्रसंगी ती पती रणवीर सिंगसोबत डिनर डेटला बाहेर गेली. तिचा आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Deepika Padukone
दीपिका पदुकोण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2024, 12:10 PM IST

मुंबई - Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पदुकोणनं 5 जानेवारीला तिचा 38 वा वाढदिवस साजरा केला. दरम्यान, या विशेष प्रसंगी तिच्या आगामी 'फायटर' चित्रपटाच्या टीमनं तिला शुभेच्छा दिल्या. याशिवाय दीपिकाच्या अनेक चाहत्यांनी तिला सोशल मीडियाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काल रात्री दीपिका पदुकोण आणि तिचा पती अभिनेता रणवीर सिंग डिनरसाठी बाहेर गेले. त्यांचा या दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण फुल स्टायलिश लूकमध्ये दिसले. हे कपल ब्लॅक मॅचिंग आऊटफिटमध्ये डिनर डेटसाठी बाहेर पडले होते.

दीपिकाचा व्हिडिओ व्हायरल : दीपिकानं स्मोकी आय मेकअपसोबत ब्राऊन रंगाची लिपस्टिक लावली होती. यावर दीपिकानं आपले केस मोकळे सोडले होते. पापाराझीच्या कॅमेऱ्यांकडे बघून दीपिका सुंदर अशी स्माईल दिली. दरम्यान दीपिका पदुकोणचा 'फायटर'च्या सेटवरून एक बीटीएस व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये ती भांगडा करताना गाण्याची रिहर्सल करताना दिसत होती. 'पठाण' दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'फायटर' हा चित्रपट 25 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण, हृतिक रोशन, अनिल कपूर आणि करण सिंग ग्रोव्हर दिसणार आहेत.

वर्क्रफंट : दीपिकाचे चाहते या चित्रपटाची वाट आतुरतेनं वाट पाहात आहेत. दरम्यान दीपिका पदुकोणच्या वर्क्रफंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'जवान' या चित्रपटामध्ये शाहरुख खानसोबत दिसली होती. पुढं ती 'लव 4 एव्हर' या चित्रपटामध्ये रणदीप, मृदुसोबत दिसणार आहे. तिचा हा चित्रपट तेलुगू असेल. 'लव 4 एव्हर' चित्रपट जयंत सी परांजी दिग्दर्शित असून या चित्रपटाचं दीपिका ही वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. यानंतर ती 'कल्की 2898 एडी' चित्रपटात दिसेल. या चित्रपटात तिच्यासोबत प्रभास, कमल हासन, दिशा पटानी, अमिताभ बच्चन, डलकर सलमान, राणा डग्गुबती आणि इतर कलाकार दिसणार आहेत. तिचा हा चित्रपट 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. अरबाज खान आणि पत्नी शुरा खानचा पाहा व्हिडिओ व्हायरल
  2. देशाची हजारो वर्षांची संस्कृती काही निवडणुकांमुळे अन् दोन-चार लोकांमुळे संपू शकत नाही - जावेद अख्तर
  3. हॉलिवूड स्टार ख्रिश्चन क्लेपसरचा दोन मुलींसह विमान अपघातात मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.