ETV Bharat / entertainment

Deepika Padukone bond with SRK : दीपिका पदुकोणनं उलगडलं शाहरुख खानसोबतच्या नात्याचं रहस्य - ओम शांती ओम चित्रपटामध्ये शाहरुख खान

Deepika Padukone bond with SRK : दीपिका पदुकोणने सुपरस्टार शाहरुख खानसोबत असलेल्या नात्याबद्दल सांगितलं आहे. त्यांचं नातं केवळ नशीबानं बनलेलं नाही तर एक खोल भावनिक संबंधाच्या जाणीवेनं तयार झाल्याचं तिनं सांगितलं.

Deepika Padukone bond with SRK
शाहरुख खानसोबतच्या नात्याचं रहस्य
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2023, 12:14 PM IST

मुंबई - Deepika Padukone bond with SRK : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने अलीकडेच बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानसोबत असलेल्या घट्ट नात्यावर प्रकाश टाकलाय. शाहरुखसोबत असलेलं नातं हे व्यावसायिकतेच्या पल्याडचं असल्याचं तिनं म्हटलंय. दोघंही एकमेकांचे लकी चार्म असल्याचं मानतात आणि आदरही करतात.

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाने सांगितलं की, त्यांचं नातं केवळ नशीबानं बनलेलं नाही तर एक खोल भावनिक संबंधाच्या जाणीवेनं तयार झालंय. तिनं पुढं असंही सांगितलं की फिल्म इंडस्ट्रीतील ती अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिच्यासाठी शाहरुख खान हळवा बनतो.

'मी त्या काही लोकांपैकी एक आहे ज्यांच्याशी तो हळवं वागतो. आमच्यात खूप विश्वास आणि आदर आहे आणि मला वाटते की नशीब हे केवळ केकवरचं चेरी आहे,' असे दीपिका पदुकोण म्हणाली.

दीपिका आणि खानची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री त्यांच्या यशस्वी वाटचालीतील एक महत्त्वाचा भाग आहे. या जोडीनं ओम शांती ओम, हॅपी न्यू इयर, चेन्नई एक्सप्रेस, पठाण आणि जवान यासह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली आहे. प्रेक्षकांनी या जोडीला पडद्यावर पाहणं नेहमी पसंत केलंय. अलीकडेच रिलीज झालेल्या 'पठाण' आणि 'जवान' या चित्रपटांच्या यशामुळे पडद्यावरची एक जबरदस्त जोडी म्हणून त्यांची स्थिती आणखी मजबूत झाली आहे.

या मुलाखतीत दीपिकाने शाहरुख आणि तिच्या चित्रपटाला मिळालेले यश हे व्यावसायिकतेच्या पलीकडचं असल्याचं म्हटलंय. त्यांच्या चित्रपटाने लोकांना मिळालेला आनंद ती महत्त्वाचा असल्याचं मानते. फिल्म इंडस्ट्रीच्या कठीण काळात लोकांना पुन्हा चित्रपटगृहाकडे वळवण्याची संधी मिळाल्याबद्दलही ती कृतज्ञता व्यक्त करताना दिसली.

दीपिकाने 'ओम शांती ओम' चित्रपटामध्ये शाहरुख खानसोबत केलेल्या पदार्पणाचंही स्मरण तिनं केलं. गेल्या काही वर्षात त्यांचं नातं अधिक दृढ झाल्याचे ती म्हणाली. शाहरुख हा तिचा सर्वात आवडता सहकलाकार असल्याचा उल्लेखही करायला दीपिका पदुकोण विसरली नाही. शाहरुखसोबत तिची जोडी कायम झळकत रहावी अशी चाहत्यांचीही अपेक्षा असते. आगामी काळातही हे दोघं पुन्हा लकरच स्क्रीन शेअर करतील, अशी आशा चाहते बाळगून आहेत.

हेही वाचा -

१. Rashid Khan Meets Ranbir Alia : रणबीर आलियाच्या भेटीने रशिद खानचा आनंद गगनात मावेना

२. Hum Toh Deewane song OUT : उर्वशी रौतेलासोबत एल्विश यादवचं पहिलं गाणं 'हम तो दिवाने' झालं प्रदर्शित ; व्हिडिओ पाहा...

३. Priyanka Chopra And Malti Marie : प्रियांका चोप्राची मुलगी मालती मेरीनं मित्रांसह केला एन्जॉय ; फोटो केले शेअर...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.