ETV Bharat / entertainment

Darlings trailer: आलिया भट्ट आणि शेफाली शाह यांच्या अभिनयाची कमाल असलेला 'डार्लिंग'चा ट्रेलर रिलीज - डार्लिंग रिलीज तारीख

जसमीत के रीन दिग्दर्शित डार्लिंग्स हा एक डार्क कॉमेडी-ड्रामा चित्रपट म्हणून ओळखला जातो. आलिया भट्टची निर्मिती असलेला हा चित्रपट 5 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रीमियर होणार आहे.

'डार्लिंग'चा ट्रेलर रिलीज
'डार्लिंग'चा ट्रेलर रिलीज
author img

By

Published : Jul 25, 2022, 12:55 PM IST

मुंबई - आलिया भट्ट, शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या डार्लिंग्सचा ट्रेलर आता रिलीज झाला आहे. आधी जाहीर केल्याप्रमाणे, आलियाने सोशल मीडियावर डार्लिंग्सचा मनोरंजक ट्रेलर शेअर केला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

मुंबईच्या पार्श्वभूमीवर असलेल्या डार्क कॉमेडीने आलियाचा चित्रपट निर्मितीमध्ये प्रवेश झाला आहे. या चित्रपटात एका आई-मुलगी जोडीच्या जीवनाचा शोध घेण्यात आला आहे. ही जोडी मुंबई शहरात त्यांचे स्थान शोधण्याचा प्रयत्न करतात, अपवादात्मक परिस्थितीत धैर्य आणि प्रेम शोधत असतात. ट्रेलरमध्ये आलिया आणि शेफालीची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे.

आलिया भट्टचा पहिला निर्मिती असलेला हा चित्रपट 5 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रीमियर होणार आहे. तिने सुपरस्टार शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या सहकार्याने तिच्या इटर्नल सनशाइन प्रॉडक्शन या बॅनरद्वारे चित्रपटाची निर्मिती केली आहे. आलियाने आधी सांगितले होते की चित्रपट कसा आकाराला आला आहे याबद्दल तिला 'अतिशय अभिमान आणि आनंद' आहे आणि ट्रेलर पाहता असे दिसते की डार्लिंग्स जगभरातील प्रेक्षकांचे मनोरंजन करेल आणि त्यांना गुंतवून ठेवू शकेल.

संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी नंतर या वर्षातील भट्टचा हा दुसरा रिलीज आहे. डार्लिंग्समध्ये विशाल भारद्वाज यांचे संगीत आणि ज्येष्ठ लेखक गुलजार यांची गीते आहेत.

हेही वाचा - शाहरुख खानने शेअर केला 'पठाण'मधील दीपिकाचा करारी लूक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.