बऱ्याच छायाचित्रकारांना चित्रपट दिग्दर्शन खुणावत असते. अशावेळी मराठी चित्रपटांची कास धरली जाते कारण मराठी सिनेमा प्रेक्षक हा चोखंदळ समजला जातो. आता ‘वेलकम बॅक’, ‘परदेस’, ‘ताल’, ‘हम आपके दिल में रेहते है‘ या व अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी केलेले छायाचित्रकार कबीर लाल हे चित्रपट दिग्दर्शनक्षेत्रात पदार्पण करीत आहेत. ते एक मराठी चित्रपट दिग्दर्शित करीत आहेत ज्याचे नावं आहे, ‘अदृश्य’ ज्यात पुष्कर जोग आणि मंजिरी फडणीस प्रमुख भूमिकांत आहेत. बॉलिवूडचा तरुण सुपरस्टार टायगर श्रॉफला सुद्धा या चित्रपटाची प्रतीक्षा असून त्याने ‘अदृश्य’ च्या टीमला ‘दृश्य’ शुभेच्छा दिल्या आहेत.
टायगर श्रॉफच्या ‘अदृश्य’ ला दृकश्राव्य शुभेच्छा ‘अदृश्य’ या चित्रपटाची प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता आणि प्रतीक्षा आहे कारण यातून एक वेगळे कथानक हाताळले गेले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर लाल हे बॉलिवुड चे प्रख्यात सिनेमॅटोग्राफर आहेत. विशेष बाब म्हणजे 'अदृश्य’ सह त्यांनी तीन अन्य भाषां मध्ये अन्य कलाकारांना घेऊन हाच चित्रपट बनवला आहे. एकाच वेळी ४ भाषां मध्ये चित्रपट शूट होणे हे पहिल्यांदाच घडत आहे. त्यातला पहिला मराठी भाषेतील चित्रपट 'अदृश्य’ पूर्णतः रेडी असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 'अदृश्य' चा टिजर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 'अदृश्य' हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असून अजय कुमार सिंग आणि रेखा सिंग हे चित्रपटाचे निर्माते आहेत. शाहिद लाल यांनी सिनेमॅटोग्राफीची धुरा सांभाळली आहे. चित्रपटाचे संकलन संजय इंगळे यांनी केले आहे आणि संवाद निखिल कटरे व चेतन किंजाळकर यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात पुष्कर जोग, मंजिरी फडणीस, अनंत जोग, उषा नाडकर्णी, अजय कुमार सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बॉलिवुड चा आघाडीचा अभिनेता टायगर श्रॉफला देखील या चित्रपटांबद्दल प्रचंड उत्सुकता आहे आणि त्यांनी आपल्या शुभेच्छा कबीर लाल सर व चित्रपटाच्या टीम ला एका व्हिडीओ संदेशाद्वारे दिल्या आहेत. ‘अदृश्य’ येत्या १३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - पूर्वाश्रमीची गर्लफ्रेंड सोमी अलीची सलमान खानला धमकी?