ETV Bharat / entertainment

Comedian suicide attempt :लाइव्ह कॅमेऱ्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न, नाना पाटेकरची मिमिक्री करतो तीर्थानंद राव - लाइव्ह कॅमेऱ्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न

कॉमेडियन तीर्थानंद रावने धक्कादायक पाऊल उचलत लाइव्ह कॅमेऱ्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. द कपिल शर्मा शोमध्ये त्याने नाना पाटेकर यांची मिमिक्री सादर केली होती.

Comedian suicide attempt
नाना पाटेकरची मिमिक्री करतो तीर्थानंद राव
author img

By

Published : Jun 14, 2023, 12:55 PM IST

Updated : Jun 14, 2023, 1:53 PM IST

मुंबई - द कपिल शर्मा शोमध्ये नाना पाटेकर यांची भूमिका केलेला कॉमेडियन तीर्थानंद रावने धक्कादायक पाऊल उचलत लाइव्ह कॅमेऱ्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. फेसबुकवर लाईव्ह करत तो सुरुवातीला आपली व्यथा मांडताना आत्महत्येसारखे पाऊल उचलण्यास भाग पाडले, याबद्दल बोलताना दिसतो. त्यानंतर तो त्याच्या हातात असलेला विषारी द्रव्याने भरलेला ग्लास प्यायला.

तीर्थानंदला हे करताना पाहून त्याच्या काही ऑनलाइन असलेल्या मित्रांनी तातडीने जवळच्या पोलीस स्टेशनला फोन केला आणि या घटनेची माहिती दिली. काही वेळातच शांती नगर पोलीस स्टेशनचे पोलीस पथक त्याच्या घरी दाखल झाले. तेव्हा कॉमेडिन तीर्थानंद राव बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

Comedian suicide attempt
कपिल शर्मासोबत तीर्थानंद राव

तीर्थानंद राव यांनी त्याच्या लाईव्ह संभाषणात सांगितले की, तो एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहतो. त्या महिलेमुळे त्याच्यावर तीन ते चार लाख रुपयांचे कर्जही झाले आहे. ती महिला त्याला बेदम मारहाण करते आणि त्याचे मानसिक शोषणही करते. असे सांगितल्यानंतर तीर्थानंद रावने फिनाईलचा डबा उघडला आणि समोर ठेवलेल्या ग्लासमध्ये टाकून पिऊन टाकले. हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर हे लाईव्ह प्रसारण पाहणाऱ्यांना ऐनवेळी काय करावे सूचत नव्हते. अखेर त्याच्या काही ओळखीतल्यांनी पोलिसांची मदत घेतली आणि पोलिसांनी उचललेल्या तातडीच्या पावलांमुळे तो रुग्णालयापर्यंत पोहोचू शकला.

लाइव्ह संभाषणामध्ये तीर्थानंद राव म्हणाला की, 'मी परवीन बानो या महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहतो. तिच्या पतीचा १० वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. तिला दोन मुलीही आहेत. ती महिला मला मानसिक त्रास देत असते. मी तिला ९० हजार किमतीचा फोन दिला. त्याच्यासाठी सर्व काही केले आणि तिने माझ्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली.'

तो पुढे म्हणाला की, 'तिने पोलिसात जाऊन मी मारहाण केल्याचे सांगितले. पोलिसांनी माझ्याविरुद्ध तक्रार नोंदवल्यानंतर ही तक्रार परत घेईन, असे ती म्हणत होती. पण तिने तक्रार मागे न घेता माझ्याशी भांडणे सुरूच ठेवले. तिच्यासोबत तिची मुलगीही मला जीवे मारण्याची धमकी देत ​​आहे. मी पाह्यलंय की परवीन तिच्या लहान मुलीला घेऊन कोणा एका माणसाकडे गेली होती. आता तुम्हीच सांगा मी तिच्यासोबत कसे जगू?' यासह आणखीनही गोष्टी आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल तो बोलत राहिला आणि अखेरीस त्याने विष पिण्याचे पाऊल उचलले.

हेही वाचा -

१. Swiggy delivery boys : शाहरुखसाठी जेवण घेऊन मन्नतवर पोहोचली स्विग्गी डिलिव्हरी टीम, का ते वाचा..

२. The Archies gang : सुहाना खान आणि अगस्त्य नंदासह द आर्चिस टीम नेटफ्लिक्स इव्हेंटसाठी ब्राझीलला रवाना

३. success bash of Zara Hatke Zara Bachke : जरा हटके जरा बचकेच्या सक्सेस पार्टीत सेलेब्रिटींची मांदियाळी

Last Updated : Jun 14, 2023, 1:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.