ETV Bharat / entertainment

सीआयडीचा फ्रेड्रिक गेला, अभिनेता दिनेश फडणीस यांचं निधन - सीआयडी

CID fame actor Dinesh Phadnis : 'सीआयडी' या टीव्ही हिट शोमध्ये फ्रेड्रिकची भूमिका साकारणारे अभिनेता दिनेश फडणीस यांचं आज निधन झालं. त्यांच्या अशा अचानक जाण्यानं प्रेक्षकांसह सीआयडीच्या सहकलाकारांनाही धक्का बसला आहे.

CID fame actor Dinesh Phadnis
सीआयडी फेम अभिनेता दिनेश फडणीस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 10:44 AM IST

Updated : Dec 5, 2023, 12:10 PM IST

मुंबई - CID fame actor Dinesh Phadnis : प्रेक्षकांच्या तीन पिढ्यांना टीव्हीच्या छोट्या पडद्यासमोर खिळवून ठेवणाऱ्या 'सीआयडी' मालिकेतले पात्र लोकांच्या घरातले सदस्यच होऊन गेले होते. एसीपी प्रद्युम्न, अभिजीत, दया, डॉ. साळुंखे, डॉ तारिका या बुद्धिमान, झुंजार टीमचा आणखी एक सदस्य म्हणजे फ्रेड्रिक. थोडा वेंधळा मन मनाने स्वच्छ असलेला फ्रेड्रिक त्याच्या सर्व टीम मेंबर्सबरोबरच प्रेक्षकांचाही लाडका होता. अभिनेता दिनेश फडणीस तब्बल वीस वर्ष फ्रेड्रिक हे पात्र अक्षरशः जगले. 57 वर्षांचे दिनेश फडणीस गेले काही दिवस यकृताच्या आजाराने त्रस्त होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची तब्येत अधिक बिघडली. त्यामुळे त्यांना मुंबईतल्या तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दिनेश यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं. अखेर दोन दिवस त्यांची मृत्यूशी चाललेली झुंज थांबली आणि मंगळवारी सकाळी त्यांचं निधन झालं. दिनेश फडणीस रुग्णालयात दाखल झाल्याचं कळल्यानंतर सीआयडी टीमचे सदस्य त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात येऊन गेले होते.

शिवाजी साटम आणि दयानंद शेट्टी यांनी दिली प्रतिक्रिया : दिनेश फडणीस यांचे 'सीआयडी' तले सहकलाकार आणि अभिनेता दयानंद शेट्टी यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, "हा हृदयविकाराचा झटका नव्हता, त्याचं यकृत खराब झालं होतं, त्यामुळे त्यांना तत्काळ मालाडच्या तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. गेल्या दोन दिवसांपासून तो आजारी होता. आज सकाळी मला कळलं की त्याच्या तब्येत कोणतीही सुधारणा झालेली नाही''. त्यानंतर त्यांनी पुढं सांगितलं , "दिनेशवर इतर काही आजारांवर उपचार सुरू होते, पण औषधांचा त्याच्या यकृतावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळेच औषधे नेहमी काळजीपूर्वक घ्यावीत असा सल्ला दिला जातो. एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीवर उपचार करण्यासाठी घेत असलेल्या औषधामुळे दुस-या आजाराचा त्रास होऊ शकतो, हे तुम्हाला कधीच कळत नाही. अ‍ॅलोपॅथीच्या औषधांबाबत अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे." दिनेश फडणीसचा यांच्या निधनाबद्दल माहिती देत असताना शिवाजी साटम यांनी म्हटलं की, ''दिनेश आजारी होता. पण तो असा अचानक जाईल असं वाटलं नव्हतं. दिनेश माझा सहकलाकार कमी आणि कुटुंबातला सदस्य जास्त होता. त्याचं हे अचानक जाणं खूप व्यथित करणारं आहे.''

नरेंद्र गुप्ता यांनी केलं ट्वीट : दिनेश फडणीस यांच्या निधन झाल्याची माहिती सीआयडीत डॉ. साळुंखे यांची भूमिका करणारे नरेंद्र गुप्ता यांनी 'एक्स' या सोशल मीडियावर करून सांगितली. त्यांनी लिहिलं, तुझी आठवण येईल मित्रा. तू जाण्याची घाई केलीस. देव तुला त्यांच्या चरणी स्थान देवो. ओम शांती. तुझ्या आत्म्याला शांती लाभो.. तुझ्या आठवणींवर आम्ही जगू. दिनेश फडणीस यांच्या अशा अचानक जाण्यानं चाहत्यांना धक्का बसला आहे. अनेकजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

'सीआयडी' लोकप्रिय शो : दिनेश फडणीस भारतीय टेलिव्हिजन 'सीआयडी' वरील आतापर्यंतच्या सर्वात लोकप्रिय रहस्यमय कथानकं असलेला शो आहे. ही मालिका सुरु झाल्यापासून ती संपेपर्यंत म्हणजे 1998 ते 2018 पर्यंत त्यांनी फ्रेड्रिक लिलया साकारला. या भूमिकेला चाहत्यांचं प्रेम मिळालं. एसीपी प्रद्युम्नच्या भूमिकेत अभिनेता शिवाजी साटम यांच्या नेतृत्वाखालील 'सीआयडी' सर्वात लोकप्रिय टेलिव्हिजन कार्यक्रमांपैकी एक शो होता. हा शो सोनी टीव्हीवर प्रसारित होत होता. दमदार कलाकारांनी आणि मनोरंजक कथानकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन या शोनं केलं. शोच्या स्टार कास्टमध्ये शिवाजी साटम, दयानंद शेट्टी, आदित्य श्रीवास्तव, जानवी छेडा गोपालिया, हृषिकेश पांडे, श्रद्धा मुसळे आणि इतर अनेक प्रतिभावान कलाकारांचा समावेश होता. दिनेश हिट सिटकॉम 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्येही छोट्या भूमिकेत दिसले होते. त्यांनी आमिर खानच्या 'सरफरोश' आणि हृतिक रोशनच्या 'सुप्पर 30'कॅमिओ भूमिकाही केली.

हेही वाचा :

  1. जॅकी श्रॉफ नीना गुप्ता स्टारर 'मस्त में रहने का' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
  2. अजय देवगण 'सिंघम अगेन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी
  3. 'कॉफी विथ करण सीझन 8'च्या शोमध्ये दिसणार कियारा अडवाणी आणि विकी कौशल; प्रोमो प्रदर्शित

Last Updated : Dec 5, 2023, 12:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.