हैदराबाद - Christmas 2023: साऊथ इंडिया स्टार अल्लू अर्जुन, राम चरण, वरुण तेज, साई धरम तेज आणि त्यांचे नातेवाईक सोमवारी ख्रिसमस 2023 साजरा करण्यासाठी एका छताखाली एकत्र आले होतो. त्यांनी त्यांच्या ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरवर्षी हे सेलेब्रिटींचे मेगा कुटुंब ख्रिसमसचा आनंद घेण्यासाठी आणि सिक्रेट सांता खेळण्यासाठी एकत्र येतात आणि 2023 हे वर्षही त्याला अपवाद ठरले नाही. ९ नोव्हेंबर रोजी वरुण तेजसोबत लग्न करणारी लावण्या त्रिपाठी ही मेगा कुटुंबातील सर्वात नवीन सदस्य बनली आहे.
वरुण तेजने इंस्टाग्रामवर फॅमिली फोटो पोस्ट करून चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोत सुंदर सजावट आणि सणाच्या प्रकाशयोजनेसह संपूर्ण ख्रिसमस सुंदर माहोल दिसत आहे. लावण्या, वरुण आणि उपासना कोनिडेला यांनी पार्टीची लाल रंगाची थीम स्वीकारली होती. दरम्यान, अल्लू अर्जुन आणि राम चरण यांनी सुंदर काळे कपडे घातले होते.
अल्लू अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर फोटोंना कॅप्शन दिले आहे, "बेस्ट कजिन. सिक्रेट सांता पार्टी." चिरंजीवीची मुलगी सुष्मिता कोनिडेला, हिने आणखी काही फोटो अपलोड करत लिहिले, "आपल्या सर्वांकडून तुम्हा सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा, सर्वांना खूप आनंद आणि प्रेम पाठवत आहे."
दरम्यान, अल्लू अर्जुनच्या वर्कफ्रंटचा विचार करता 2023 हे एक फलदायी वर्ष होते. अल्लु अर्जुनने पुष्पा 2 ची घोषणा केली, तसेच पुष्पा मधील त्याच्या अभिनयासाठी त्याला प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. या पुरस्कारासह तो सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा पहिला तेलुगू अभिनेता बनून इतिहास घडवला.
अल्लू अर्जुन सध्या दिग्दर्शक सुकुमारसोबत 'पुष्पा: द रुल' या चित्रपटाचे शुटिंग करत आहे. याउलट, राम चरण हे चित्रपट निर्माता शंकर यांच्या 'गेम चेंजर'सोबत काम करण्यात गुंतला आहे. याशिवाय, अभिनेता 2024 मध्ये मानुषी छिल्लरसोबत 'ऑपरेशन व्हॅलेंटाइन'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. निहारिका कोनिडेला, साई धरम तेज आणि पंजा वैष्णव तेज हे सर्व वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करत आहेत.
हेही वाचा -