हैदराबाद - दाक्षिणात्य मेगास्टार चिरंजीव ( megastar Chiranjeevi ) त्याच्या करियरच्या कठीण काळातून जात आहे. अलिकडेच त्याचा आचार्य ( Acharya ) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल करु शकला नव्हता. सध्याच्या या खडतर पेचातून बाहेर पडण्यासाठी व आपले नशीब बदलण्यासाठी त्याच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये अतिरिक्त 'ई' जोडण्याच्या चर्चेने खळबळ उडाली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
चिरंजीवीचा आगामी गॉडफादर ( Godfather ) चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक टिझर रिलीज झाला. यात त्याच्या चिरंजीवी ( Chiranjeeevi ) नावातील इंग्रजी अक्षरामध्ये अतिरिक्त 'ई' ( e ) दिसून आला आणि त्यानंतर चाहत्यांसह प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण आले. चिरंजीवीने आगामी काळात चित्रपट चांगला हिट व्हावा म्हणून अंकशास्त्रज्ञाची मदत घेतली आहे, असा समज करून काही तेलुगू पोर्टल्सने बातम्या छापल्या.
त्यानंतर हे निष्पन्न झाले की या सर्व अफवा व्यर्थ आहेत. खरंतर नाव बदलण्यासारखे काही नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'गॉडफादर'च्या फर्स्ट लूक टीझरमध्ये टायपोग्राफिकल त्रुटीमुळे अतिरिक्त 'ई' आला आहे. आता हा अतिरिक्त ई टिझरमधून हटवण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र जुन्या तारखेला रिलीज झालेल्या टिझरमध्ये अद्यापही हेच नाव दिसत आहे.
चिरंजीवीच्या चाहत्यांनी 'नाव बदला'चे समर्थन केले होते. दरम्यान ही तांत्रिक चूक असली तरीही अनेक सोशल मीडिया युजर्सनी 'गॉडफादर्स प्रोडक्शन हाऊस'वर या गचाळपणाबद्दल टीका केली आहे.
हेही वाचा - ब्लू फ्लॉवर बिकिनीमधील मौनी रॉयचा नवा अवतार