ETV Bharat / entertainment

Boycott Adipurush trends : ट्विटरवर बॉयकॉट आदिपुरुष ट्रेंड, रावण आणि हनुमानाचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप

व्हिज्युअल इफेक्ट्सवर नव्याने काम करूनही, आदिपुरुष चित्रपट बहिष्काराच्या ट्रेंडपासून सुटू शकला नाही. भगवान हनुमान आणि रावण यांच्या चित्रणावर अनेकांनी आक्षेप घेऊन चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आदिपुरुष चित्रपट शुक्रवारी संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला.

Boycott Adipurush trends
ट्विटरवर बॉयकॉट आदिपुरुष ट्रेंड
author img

By

Published : Jun 16, 2023, 4:02 PM IST

मुंबई - आदिपुरुष चित्रपटाची चर्चा वेगवेगळ्या कारणामुळे ट्रेंडिंग चार्टमध्ये टॉपवर सुरू होती. प्रभास आणि क्रिती सेनॉन यांच्यात सुरु असलेल्या प्रेमाची चर्चा, तिरुपती मंदिर परिसरात ओम राऊतने क्रिती सेनॉनचे घेतलेले चुंबन प्रकरण याची चर्चा सुरू असतानाच चित्रपट रिलीज झाला आहे. आता या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचा ट्रेंडही सुरू झाला आहे. आदिपुरुषमधील सैफ अली खानच्या रावणाच्या भूमिकेवर नेटिझन्स नाराज झाले आहेत.

  • With due respect, here you are slightly wrong, sir.

    The boycott is not because, to stop producers to dare to make hindu theme based movies.

    In the movie, Hanuman Ji is portrayed as a MULLA. Prabhu Shri Ram is wearing leather shoes. Do u think it's legitimate?#BoycottAdipurush pic.twitter.com/vOwA3AOWOh

    — Gudamit 🇮🇳 🚩 (@gudamit) June 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आदिपुरुष बाबत नेटिझन्सनी घेतलेल्या भूमिकेला समाजातील एका मोठ्या वर्गाकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, लांब दाढी असलेला, काटेरी केसांचा दुष्ट असे रावणाचे चित्रण पाहून नेटिझन्स नाराज झाले आहेत. लेदर बेल्टच्या कपड्यांमध्ये भगवान हनुमानाचे स्वरूप पाहूनही इतर अनेकजण नाराज झाले आहेत.

सैफ अली खानने साकारलेल्या लंकेशवर अनेकांनी आक्षेप घेतला. यातील रावण विचीत्रपणे दाखवल्याचा ठपका निर्मात्यांवर ठेवण्यात आलाय. अभिनेता प्रभासनेही निराश केले असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त करत बॉयकॉट आदिपुरुष हा हॅशटॅग वापरलाय.

दुसऱ्या एका घटनेत, ब्राह्मण महासभेने ओम राऊत यांना नोटीस पाठवली होती, 'या चित्रपटात हिंदू देवी-देवतांचे चित्रण अत्यंत चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे. विकृत रूप, चामड्याचे कपडे घातलेली पात्रे, चित्रपटात धार्मिक आणि जातीय द्वेष पसरवणारे संवाद आणि चित्रण आहे. रामायण हा आपला इतिहास आणि आपला आत्मा आहे, मात्र आदिपुरुषात भगवान हनुमानाला न्याय मिळालेला नाही.'

  • टैटू वाला मेघनाथ !
    सर्पों में खेलता हुआ रावण !

    भले ही आज हंसी आ रही है, परन्तु याद रखियेगा OTT पर सालों साल डॉक्युमेंटेड रहेगी यह फिल्म और आने वाली पीढ़ियां देख के अपने इतिहास पर ही मखौल करेंगी !#BoycottAdipurush https://t.co/Hi2MRFftNE pic.twitter.com/h7J6KwuLbg

    — Loomi Modgil (@LoomiModgil) June 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'कोणता हिंदू मिशीशिवाय दाढी ठेवतो, भगवान हनुमानजींना तसे दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट रामायण आणि भगवान राम, माँ सीता, भगवान हनुमान यांचे संपूर्ण इस्लामीकरण आहे. अगदी सैफ अली खान जो रावणाची भूमिका साकारत आहे. आदिपुरुष हा चित्रपट तैमूर आणि खिलजीसारखा दिसतोय. हा चित्रपट देशातील धार्मिक भावना भडकावून एका विशिष्ट वर्गामध्ये द्वेष पसरवणार आहे. हे चित्र इंटरनेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध केले जात आहे, जे आपल्या समाजासाठी आणि देशासाठी पूर्णपणे हानिकारक आहे. तुम्ही कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावणारा चित्रपट बनवत आहात,' असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा -

१. Adipurush Producers Dispute : आदिपुरुष निर्मात्यांमध्ये वाद, प्रदर्शन स्थगितीसाठी हायकोर्टमध्ये धाव

२. Adipurush Movie : थिएटरच्या झरोक्यातून माकडाने पाहिला 'आदिपुरुष' !

३. Adipurush Seat Reserved : आरक्षित खुर्चीवरुन बजरंगी बलीने पाहिला आदिपुरुष, थिएटरमधील व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.