मुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ निर्माते बोनी कपूर यांनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या त्यांच्या 27 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आठवण जागवली. इंस्टाग्रामवर बोनी कपूरने एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले, '2 जून 1996 आम्ही शिर्डीत लग्न केले. आज त्या प्रसंगाला , आम्ही 27 वर्षे पूर्ण केली.' फोटोमध्ये हे जोडपे पोज देताना दिसत आहे. दिग्गज चित्रपट निर्मात्याने फोटो शेअर केल्यानंतर लगेचच, चाहत्यांनी लाल हृदय आणि फायर इमोटिकॉन्ससह कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
बोनी कपूरने शिर्डी मंदिराच्या आवारातील पूर्वीही कधीही न पाहिलेला एक फोटो देखील शेअर केला आहे. ज्याला त्यांनी कॅप्शन दिलंय, 'आम्ही आमच्या लग्नाला 27 वर्षे पूर्ण केली आहेत.' हा फोटो त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीज सेक्शनवर शेअर केला आहे. श्रीदेवीने गुलाबी साडी नेसली असून बोनी कपूर पांढऱ्या धोतरात आणि शाल घातलेल्या पारंपारिक पोशाखात दिसत आहेत.
बोनी कपूरने शेअर केलेल्या या श्रीदेवींच्या फोटोमुळे चाहत्यांच्या भावना उचंबळून आल्या. अनेकांनी भावनिक होऊन प्रतिक्रिया दिल्या. श्रीदेवी यांनी 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबई येथे अखेरचा श्वास घेतला. दुबईत त्या एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या आणि हॉटेलच्या बाथटफमध्ये त्यांचा मृतदेह आढळला होता. दरम्यान, बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि तिची धाकटी बहीण खुशी कपूर यांनी त्यांच्या आई वडिलांच्या लग्नाच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या इन्स्टा स्टोरीजवर हे फोटो शेअर केले.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीने चांदनी, लम्हे, मिस्टर इंडिया, चालबाज, नगीना, सदमा आणि इंग्लिश विंग्लिश यासारख्या हिंदी चित्रपटांमधील तिच्या प्रतिष्ठित भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य केले. पद्मश्री पुरस्कार विजेत्या श्रीदेवीने तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये तिच्या अविस्मरणीय अभिनयाने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला.
मॉम हा श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट होता, ज्यासाठी तिला मरणोत्तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. दुसरीकडे, बोनी अलीकडेच रणबीर कपूर, श्रद्धा कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्यासोबत तू झुठी मैं मक्कर या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसला होता. त्याची आगामी निर्मिती अजय देवगणचा स्पोर्ट्स बायोपिक चित्रपट मैदान असणार आहे.
अजय देवगण या चित्रपटात दिग्गज प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारणार आहे. रहीम यांना भारतीय फुटबॉलचे संस्थापक जनक म्हणून ओळखले जाते. या चित्रपटात प्रियमणी, गजराज राव आणि बंगाली अभिनेता रुद्रनील घोष यांच्याही भूमिका आहेत. 23 जूनला हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
हेही वाचा -