ETV Bharat / entertainment

G20 summit : जी20 शिखर परिषदेसाठी बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा... - Deepika Padukone on G20 summit

G20 summit : जी20 शिखर परिषदेसाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, शाहरुख खान आणि आलिया भट्टनं पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

G20 summit
G20 शिखर परिषद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 5:17 PM IST

मुंबई - G20 summit : दिल्लीत नुकतेच झालेल्या जी20 शिखर परिषदेसाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. आता या सेलिब्रिटींच्या यादीत दीपिका पदुकोणही सामील झाली आहे. मंगळवारी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत, दीपिकानं जी20 शिखर परिषदेबद्दल लिहलं, भारताची 'उल्लेखनीय कामगिरी'. त्यानंतर रणवीर सिंगनेही शिखर परिषदेच्या यशाबद्दल पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केले. आता आलिया भट्टनेही या शिखर परिषदेबद्दल ट्विट करत हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचं म्हटलं आहे.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगची पोस्ट : दिल्लीतील जी20 शिखर परिषदेची स्टोरी शेअर करताना दीपिका पदुकोणनं लिहिलं, 'अभूतपूर्व जी20 शिखर परिषदेचं आयोजन केल्याबद्दल अभिनंदन! आपल्या देशाची क्षमता जगाला दाखवणारी एक संस्मरणीय आणि उल्लेखनीय कामगिरी आहे. दीपिकानं यामध्ये पंतप्रधान मोदींना देखील टॅग करत शुभेच्छा दिल्या आहे. त्यानंतर रणवीरनं त्याच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिलं, 'आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे यशस्वी जी20 शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल, उज्ज्वल भविष्यासाठी राष्ट्रांना एकत्र आणल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य. अशी पोस्ट लिहून त्यानं नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

  • One Earth. One Family. One Future 🫶🏼

    A historic moment for India… Congratulations to Hon'ble PM @narendramodi ji for successfully hosting the G20 Summit. Such a proud moment to witness this monumental event that fosters unity between nations and bridges alliances for a better… https://t.co/WFcr0Ip9AV

    — Alia Bhatt (@aliaa08) September 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आलिया भट्ट आणि शाहरुख खानची पोस्ट : आलिया भट्टनं एक्सवर पोस्ट करत लिहलं, 'एक पृथ्वी. एक कुटुंब. एक भविष्य. भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण... जी20 शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन. याआधी शाहरुख खाननंही शिखर परिषदेच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले होत. किंग खाननं त्याच्या पोस्टमध्ये लिहलं, 'माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं भारताच्या जी20 अध्यक्षपदाच्या यशाबद्दल आणि जगातील लोकांच्या चांगल्या भविष्यासाठी राष्ट्रांमध्ये एकता वाढवल्याबद्दल अभिनंदन.' त्यानंतर शाहरुखनं पुढं लिहलं, यामुळं प्रत्येक भारतीयाच्या मनात आदर आणि अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. सर, तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही एकाकी नाही तर एकात्मतेनं समृद्ध होऊ. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य ही पोस्ट करत किंग खाननं नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

  • Congratulations to Hon. PM @narendramodi ji for the success of India’s G20 Presidency and for fostering unity between nations for a better future for the people of the world.
    It has brought in a sense of honour and pride into the hearts of every Indian. Sir, under your… https://t.co/x6q4IkNHBN

    — Shah Rukh Khan (@iamsrk) September 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा :

  1. Welcome to the Jungle Controversy: अक्षय कुमार स्टारर 'वेलकम 3'चं शूटिंग झालं बंद ; जाणून घ्या कारण...
  2. Jawan box office collection day 6 : शाहरुख खान आणि नयनताराचा 'जवान' बॉक्स ऑफिसवर करत आहे धमाल....
  3. Kareena Kapoor Khan : करीना कपूर खाननं लग्न आणि मुलाच्या नावाच्या वादावर केला खुलासा...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.