मुंबई - किल्ले प्रतापगडावर महाराजांनी अफजलखानासारख्या बलाढ्य शत्रूला पराजित करत यमसदनास धाडले होते. गनिमीकाव्याने खेळले गेलेले हे युध्द आणि मिळवलेला प्रचंड विजय महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच विसरला जाऊ शकत नाही. शिवचरित्रातील ही यशस्वी गाथा ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या रुपाने पडद्यावर जीवन केली आहे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर याने. अफजलखानाचा कपटी डाव महाराजांनी आपल्या तल्लख बुद्धिमत्तेने त्याच्यावरच कसा उलटवला याची छोटीशी झलक उपस्थितांना रंगमंचावर प्रत्यक्ष पहायला मिळाली. महाराजांची गळाभेट, अफजलखानाचा फसलेला कपटी डाव आणि त्यानंतर महाराजांनी खानाचा बाहेर काढलेला कोथळा हे सर्व पाहून इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचा भास उपस्थितांना झाला. निमित्त होते ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळयाचे.
‘शेर शिवराज’मध्ये बॉलिवूड अभिनेता मुकेश ऋषी साकारणार अफजलखान, ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला! - Sher Shivraj directed by Digpal Lanjekar
'शेर शिवराज' चित्रपटात अफजलखानाची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता गेले अनेक दिवस साऱ्यांनाच लागली होती. त्या रहस्याभोवतीचा पडदा या ट्रेलर अनावरण सोहळयाच्या निमित्ताने उघडला. बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी अफजलखानाची भूमिका साकारणार आहेत.