मुंबई - Boby Deol dance moves in Jamal Kadu : संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अॅनिमल' या चित्रपटाला समीक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला असला, तरी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई होत आहे. या चित्रपटातील गाणीही लोकप्रिय ठरली आहेत. अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातून अनुभवी अभिनेता बॉबी देओलनं रुपेरी पडद्यावर यशस्वी पुनरागमन करत अनेक विक्रम रचले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
त्यानं साकारलेली 'अबरार हक' ही व्यक्तीरेखा दमदार ठरलीय. तर 'जमाल कुडू' या व्हायरल गाण्यात बॉबी देओलनं केलेली एन्ट्री त्याच्या नृत्याच्या स्टेप्समुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. अलीकडे, एका मुलाखतीत बॉबी देओलनं सांगितलं की, या गाण्यातील डान्स स्टेप त्यानं कशा आत्मसात केल्या.
मुलाखती दरम्यान, बॉबी देओलनं 'जमाल कुडू'वर अपार प्रेम करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले. लोक त्यांच्या डोक्यावर ग्लास ठेवून त्याच्या डान्स स्टेपची नक्कल करताना पाहून आणि अगदी त्याच्यासारखाच सूट परिधान करताना पाहून भारावून गेल्याचा उल्लेख त्यानं केला.
बॉबीनं पुढं स्पष्ट केलं की, संदीप रेड्डी वंगाने हे गाणे त्याच्यासोबत अगोदरच शेअर केलं होतं, कारण त्याला संगीताची उत्तम जाण आहे आणि चित्रपट निर्मितीची एकूण कला अवगत आहे. संदीपला हे गाणं मिळाल्यानंतर बॉबी देओलला कळवलं होतं की, ते त्याच्या पात्राच्या परिचयाच्या सीन्समध्ये वापरलं जाईल. जेव्हा त्यांनी शूटिंग सुरू केलं तेव्हा कोरिओग्राफरनं बॉबीला डान्स स्टेप करण्यास सांगितले.
शूटींग आधी रिहर्सल करताना बॉबी गोंधळला आणि त्यानं विचारलं की त्याला नेमकं काय करायचे आहे, यावर कोरिओग्राफरनं उत्तर दिलं की, "बॉबी देओलसारखं करू नको." त्यावेळी, बॉबी अभिनेता सौरभ शुक्लाकडे वळला, त्यानं या सिनेमात त्याच्या भावाची भूमिका केली आहे आणि त्याला ते कसे करायचे याचे प्रात्यक्षिक करण्यास सांगितलं.
बॉबीनं सांगितले की, तो दुसर्याच्या डान्स स्टेप्सची कॉपी करण्याच्या विरोधात आहे. त्यानं यावेळी आपल्या खूप पूर्वी दिलेल्या पंजाब भेटीच्या दरम्यानची गोष्ट सांगितली. त्यानं डोक्यावर ग्लास ठेवून इतरांसोबत मद्यपान केलं होतं. 'जमाल कुडू'च्या चित्रीकरणादरम्यान त्याला या गोष्टीची आठवण अनपेक्षितपणे पुन्हा उफाळून आली. संदीप रेड्डी वंगा यांनी बॉबीच्या सुधारित डान्स स्टेपचं कौतुक केलं आणि त्याला मान्यता दिली.
'जमाल कुडू' या गाण्याचं मूळ हे इराणी गाण्यात आहे. हे गाणं दहा वर्षापूर्वी आलेल्या खतरेह ग्रुपच्या 'जमाल जमालू' नावाच्या इराणी ट्रॅकची सुधारित आवृत्ती आहे. नवीन आवृत्ती हर्षवर्धन रामेश्वर यांनी पुन्हा तयार केली आहे. दरम्यान, 'अॅनिमल' 1 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आणि त्याच्या प्रचंड यशानंतर, 'अॅनिमल पार्क' नावाचा सिक्वेल तयार होत आहे.
हेही वाचा -