मुंबई - बॉलिवूड सेलिब्रिटी अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या आलिशान गाड्या सोडल्या आणि कामावर पोहोचण्यासाठी दुचाकीवर बसून प्रवास करणे पसंत केले. मुंबईतील वाहतुकी कोंडीतून त्यांनी अशा प्रकारे स्वतःपुरता मार्ग काढला. रविवारी अमिताभ यांनी अशी दुचकीवर बसून सवारी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनुष्का शर्मानेही हाच मार्ग अवलंबला. अनुष्काला दुचाकीवरुन जाताना पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.
नेटिझन्सच्या बिग बी आणि अनुष्का विरुद्ध तक्रारी - अमिताभ आणि अनुष्काचे फोटो आणि व्हिडिओ ऑनलाइन समोर आल्यानंतर, अनेक सोशल मीडिया युजर्सनी तक्रार केली की अभिनेता बच्चन किंवा चालक दोघांनीही हेल्मेट का घातलेले नाहीत. ट्विटरवर नेटिझन्सनी त्यावर आक्षेप घेतला आणि मुंबई पोलिसांना टॅग देखील केले. पोलिसांनी ट्विटवर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, 'आम्ही हे वाहतूक शाखेशी शेअर केले आहे.' खरंतर जेव्हा अमिताभ यांनी बाईक राइड करत असतानाची पोस्ट शेअर केली होती तेव्हाच त्या दुचाकीस्वाराकडे अथवा अमिताभ यांच्याकडे हेल्मेट नव्हते. त्यामुळे यावर टीका होणार हे नक्की होते.
रविवारी अमिताभ यांनीच फोटो केला होता शेअर - रविवारी बिग बींनी हे छायाचित्र पोस्ट करत मुंबईतील ट्रॅफिकबाबत तक्रार केली. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, 'राइडसाठी धन्यवाद मित्रा.. ओळखत नाही.. पण तुम्ही मला कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचवले.. जलद आणि न सुटणारी ट्रॅफिक जाम टाळत.. शॉर्ट्स आणि पिवळा टी शर्ट मालकांना, धन्यवाद.'
अमिताभ आणि अनुष्काची वर्कफ्रंट - दरम्यान, वर्क फ्रंटवर, नाग अश्विनच्या प्रोजेक्ट के मध्ये अमिताभ दीपिका पदुकोण आणि प्रभास सोबत दिसणार आहेत. हा द्विभाषिक चित्रपट आहे - हिंदी आणि तेलुगू या दोन भाषांमध्ये एकाच वेळी विविध ठिकाणी शूट केला गेला आहे. बिग बी रिभू दासगुप्ताच्या पुढील कोर्टरूम ड्रामा चित्रपट सेक्शन 84 मध्ये देखील दिसणार आहे. अनुष्का शर्मा आगामी प्रोसित रॉयच्या स्पोर्ट्स बायोपिक चकडा एक्सप्रेसमध्ये झळकणार आहे. या चित्रपटात ती क्रिकेटर झुलन गोस्वामीची भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा - Adah Sharma Road Accident : 'द केरळ स्टोरी'च्या वाहनाला अपघात, अदा शर्माने सुखरुप असल्याची दिली माहिती