मुंबई : सलमान खानचा बिग बॉस ओटीटी २ शो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे कारण बिग बॉस घरामध्ये रोज वेगवेगळे रोज टास्क स्पर्धकांना दिले जात आहे. आता अलीकडील बिग बॉस ओटीटी २ च्या ७व्या भागामध्ये बिग बॉसने बेबीका धुर्वेला तुरुंगात असताना एक टास्क दिले, बेबीकाला लोकांचे चेहरे वाचण्याची आणि त्यांची खरी वैशिष्ट्ये उघड करण्यास सांगितल्या गेले. प्रेक्षकांनी निवडलेल्या जिया शंकर, मनीषा राणी, पूजा भट्ट आणि अभिषेक मल्हान यांचे चेहरे वाचून दाखविण्याच्या बेबीकाला सांगितल्या गेले होते.
बेबीकाने वाचला अभिषेकचा चेहरा : बेबीकाने अभिषेकचा चेहरा वाचताना त्याला दोन चेहरे असल्याचे म्हटले आणि त्याला चापट मारण्याबद्दलही तिने म्हटले, त्यानंतर तिने सांगितले की, अभिषेकची सर्जनशीलता चांगली आहे आणि त्याने कोंन्टेड चोरणे थांबवले पाहिजे असाही तिने अभिषेकला सल्ला दिला. त्यानंतर बेबीका आणि अभिषेकमध्ये जोरदार वाद झाला. अभिषेकने भांडणात बेबीकाला स्वत;चा चेहरा वाचण्यास सांगितले, आणि तोड बंद ठेव असेही त्याने म्हटले, त्यानंतर अभिषेकने पुढे म्हटले "कुत्ते के भौकने पर पत्थर नहीं मारते (कुत्रा भुंकल्यावर दगड फेकू नका)" असे उत्तर दिल्यानंतर परिस्थिती आणखीनच बिकट झाली, ज्यावर बेबीका परत ओरडली आणि दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. त्यानंतर बिग बॉसने फलक नाजला तिला तुरूंच्या बाहेर काढण्यास सांगितले. त्यानंतर फलकने बेबीकाला तुरूंच्या बाहेर काढले.
जाद हदीदने आकांक्षा पुरीला दिला लग्नाचा प्रस्ताव - दरम्यान, कारागृहाजवळ जाद हदीदचे आकांक्षा पुरी समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला ज्यावर आकांक्षा लाजली आणि तिने त्याला सांगते की नातेसंबंधात पुढे जाण्यापूर्वी तिला थोडा वेळ हवा आहे. सलमान खानच्या बिग बॉस ओटीटी २ वर घरातून काढण्याच्या प्रथम नामांकनात बेबीका धुर्वे, जिया शंकर, पलक पुरस्वानी आणि अविनाश सचदेव इतके स्पर्धेक आहे. बिग बॉस ओटीटी २चा आगामी भाग जीओ सिमेमा या ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर पाहणे मनोरंजक असणार आहे. कारण शोमध्ये दिवसेंदिवस वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बिग बॉस ओटीटी २ या शोमध्ये काय होईल हे येणाऱ्या काळात समजेल.
हेही वाचा :