ETV Bharat / entertainment

Bigg Boss 17 : वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस'मध्ये स्पर्धकांच्या आयुष्यातील रहस्ये येणार समोर... - रिअ‍ॅलिटी शो

Bigg Boss 17 : 'वीकेंड का वार' मध्ये सलमान खाननं घरातील सदस्यांचे गैरसमज दूर केले आहेत. वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस'च्या नवीन सीझनच्या आगामी एपिसोडमध्ये स्पर्धकांच्या आयुष्यातील रहस्ये समोर येणार आहेत.

Bigg Boss 17
बिग बॉस 17
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2023, 10:58 AM IST

मुंबई - Bigg Boss 17 : सलमान खान त्याच्या सर्वात लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस'च्या नवीन 17 सीझन हा 15 ऑक्टोबरपासून घेऊन आला आहे. 'बिग बॉस'च्या प्रेक्षकांमध्ये या शोबद्दल खूप उत्सुकता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही 'बिग बॉस'चा नवा सीझन कलर्स टीव्हीवर प्रसारित होतोय. हा शो सुरु झाल्यापासून खूप चर्चेत आहे. दरम्यान 'वीकेंड का वार'मध्ये होस्ट सलमान खाननं स्पर्धकांचे गैरसमज दूर केल्यानंतर, या शोमध्ये अनेक खुलासे झाले आहेत. आता या शोमध्ये अंकिता लोखंडे आणि विक्की जैन या दाम्पत्यामध्ये जोरदार वादावादी झाल्याचं पाहायला मिळत असताना, अंकितानं पती विकीकडे लक्ष आणि वेळ न दिल्याची तक्रार केली.

विकी जैन आणि अंकिता लोखंडेचं भांडण : विकी जैन तिला म्हणतो की, 'मी तुझ्या भोवती मागे मागे फिरू शकत नाही. तो इथे नाक कापून घ्यायला आलेलो नाही'. त्याला प्रत्युत्तर देताना अंकिता म्हणते की, 'माझ्यावर या गोष्टीचा परिणाम होतोय.'. पुढे तो म्हणतो, 'माझ्याकडून हे होणार नाही'. 'बिग बॉस'मध्ये सध्या अंकिता आणि विकीमध्ये वाद पाहायला मिळत आहेत. दोघांची अनेक विषयांवर वेगवेगळी मतं असतात. या जोडप्यामध्ये मतभेद स्पष्ट लक्षात येतात. या शो दरम्यान अंकिता रडतानादेखील दिसली होती. या दोघांच्या नात्यामध्ये काहीसा कडवटपणा दिसून येतोय. याशिवाय अभिनेत्री मन्नारा चोप्रा देखील खूप प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. घरातील वातावरणाने उत्साहित राहावे यासाठी ती रॅपिंग करत दिसते.

मुनावर फारुकी झाला भावूक : स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारुकी आणि मन्नारा एकत्र रॅप गात आहे. याशिवाय तो नील भट्टशी आपल्या मुलाबद्दल बोलताना भावूक होताना देखील दिसत आहे. तो आपल्या पाच वर्ष वयाच्या मुलाच्या आठवणीत खिन्न झालेला दिसला. आता तीन - चार महिन्यापासून आपण त्याच्याशी खूप कनेक्ट झालोय. तो माझ्याबरोबर नेहमी आहे. पण मला त्याची खूप आठवण येतेय, असं म्हणत तो मन मोकळं करताना दिसला. त्यानंतर नीलने त्याचं सांत्वन करत त्याला भावनिक आधार दिला.

हेही वाचा :

  1. Urfi Javed Bandra Police Station Video : उर्फी जावेदचा वांद्रे पोलिस स्टेशनमधील व्हिडिओ झाला व्हायरल; पहा व्हिडिओ...
  2. Bigg boss 10 : 'बिग बॉस कन्नड'च्या 10व्या सीझनमधील स्पर्धक वरथूर संतोषला झाली अटक ; जाणून घ्या काय आहे प्रकरण...
  3. Ganapath Box Office Collection Day 4 : टायगर श्रॉफ स्टारर 'गणपथ' बॉक्स ऑफिसवर कमाईच्याबाबतीत ठरला अपयस्वी...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.