मुंबई - Bigg Boss 17 : 'बिग बॉस'चा 17वा सीझन सुरू आहे. हा सीझन दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. यामध्ये अनेकदा स्पर्धकांमध्ये भांडणं पाहायला मिळत आहे. दरम्यान, बिग बॉसच्या आगामी एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये विकी जैन आणि मन्नारा चोप्रा यांच्यात बाचाबाची होत असल्याचं दिसत आहे. बिग बॉसच्या आगामी एपिसोड प्रोमोमध्ये मन्नारा चोप्रा तिचा राग विकी जैनवर काढताना दिसत आहे. शेअर केलेल्या प्रोमो व्हिडिओमध्ये नॉमिनेशन टास्क दाखवण्यात आले होते. या टाक्समध्ये अंकिताला स्पर्धकाचा फोटो लावायचे होता आणि त्यानंतर स्पर्धकांना नॉमिनेशन बजर वाजवायचा होता.
अंकिता आणि विकीची आई प्रवेश करणार : या टाक्स दरम्यान, विकी जैननं मन्नारा चोप्राला नॉमिनेट केलं. त्यानंतर मन्नारा संतापली आणि तिनं विकीला म्हटलं, 'चुप राहा, मी तुमच्याशी बोलत नाही.' या आठवड्यातील नामांकित स्पर्धकांमध्ये मन्नारा चोप्रा, विकी जैन, समर्थ, अभिषेक, अरुण, आयशा आणि मुनावर फारुकी यांचा समावेश आहे. याशिवाय आणखी एका प्रोमोमध्ये अंकिताची आई आणि नंतर विकीची आई बिग बॉसच्या घरात प्रवेश करताना दिसत आहेत. शेअर केलेल्या प्रोमोमध्ये अंकिताची आई ही अंकिता आणि विकीला समजवताना दिसली. त्यानंतर दुसऱ्या एका प्रोमोमध्ये विकीची आई घरातील सदस्यांसाठी शायरी म्हणताना दिसली.
अंकाताचे पारडे जड : अंकिताची आई आणि विकीच्या आईचा प्रोमो हा अनेकांना आवडला आहे. आता या आगामी एपिसोडसाठी 'बिग बॉस'च्या घरात खूप धमाल होताना दिसणार आहे. प्रोमोच्या पोस्टवर आता अनेकजण कमेंट्स करत आहे. एका यूजरनं म्हटलं, ''अंकिताची आई ही खूप गोड आहे, खूप विचारपूर्वक बोलते आणि समजवते.'' दुसऱ्या एकानं म्हटलं, या शोची विजेती अंकिताचं असणार, कारण ती खूप चांगली खेळत आहे.'' आणखी एकानं म्हटलं, ''विकी हा अंकिताला खूप कमी लेखतो, त्यामुळं तो जिंकू शकणार नाही. अंकिताला सर्वजण प्रचंड वोट देऊन विजयी करतील. '' अशा अनेक कमेंट्स या पोस्टवर येत आहेत.
हेही वाचा :