ETV Bharat / entertainment

बिग बॉस 17 दिवस 51 हायलाइट्स: समर्थ जुरेलचा अंकिता लोखंडेशी पंगा, मन्नारानं अभिषेक कुमारला म्हटलं 'सडकछाप' - दिल दिमाग आणि दम घरे विसर्जित

Bigg Boss 17 day 51 highlights : बिग बॉस 17 मध्ये अनेक नॉमिनेशनच्या दरम्यान उलथापालथी झाल्या आणि अखेर समर्थ जुरेल यांनी अंकिता लोखंडेची खिल्ली उडवली. नॉमिनेशनच्या आधी समर्थ जुरेल यांनी अंकिता लोखंडेची खिल्ली उडवली. शिवाय, मन्नारा चोप्रा दुसर्‍या एका प्रसंगात अभिषेक कुमारवर कमेंट करताना दिसली, तिनं त्याला सडक छाप म्हटलं.

Bigg Boss 17 day 51 highlights
बिग बॉस 17 दिवस 51 हायलाइट्स
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 10:34 AM IST

Updated : Dec 5, 2023, 1:57 PM IST

मुंबई - बिग बॉस 17 सुरू झाल्यापासून त्यात घडणारे नाट्य प्रेक्षकांची भरपूर करमणूक करणारं आहे. कार्यक्रमाचा 51 व्या भागात अशाच अनेक घटना घडल्या. ज्यामुळे स्पर्धक बरेच अस्वस्थ झाले आणि प्रेक्षकांचं मनोरंजन झालं. या भागात नॉमिनेशन्स उघड झाल्यानंतर दिल, दिमाग आणि दम घरे विसर्जित झाली. या घोषणेनंतर समर्थ जुरेलनं अंकिता लोखंडेवर आपला राग काढला. यामुळे ती भावूक झाल्याचं दिसलं. मन्नारा चोप्रा आणि समर्थ यांच्यातल्या गॉसिपच्या चर्चेत दोघंही अभिषेक कुमार आणि खानजादी यांच्या प्रेमाच्या अँगलवर चर्चा करताना दिसले.

8 स्पर्धकांचं या आठवड्यात नॉमिनेशन

बिग बॉस 17 च्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये नॉमिनेशन प्रक्रिया सोमवारच्या एपिसोडमध्ये पार पडली. बिग बॉसनं सांगितलं की, ज्या उमेदवाराला घरातून काढून टाकायचं आहे त्याच्यावर कॉफी टाकावी. नॉमिनेशन टास्क दरम्यान बऱ्याच उलथापालथी घडल्या. यामध्ये घरातील अर्ध्या स्पर्धकांना यामध्ये नॉमिनेशनला सामोरं जावं लागलं. टास्कच्या अखेरीस मुनावर फारुकी, विकी जैन, अभिषेक कुमार, खानजादी, अनुराग डोभाल, नील भट्ट, अरुण महाशेट्टी आणि सना रईस खान यांना या आठवड्यात घराबाहेर जाणाऱ्या स्पर्धक म्हणून नॉमिनेशन मिळाले.

समर्थ जुरेल, अभिषेक कुमार खानजादीसोबत फ्लर्ट करताना मन्नारा चोप्रा

मागील एपिसोड्समध्ये अभिषेक कुमारसोबत चांगलं सूत जमलेला समर्थ जुरेल बिग बॉसच्या सोमवारच्या भागात त्याच्या विरोधात गेला. खानजादी आणि अभिषेक एकत्र आराम आणि मजा मस्ती करत असताना मन्नारा चोप्रा, समर्थ आणि मुनावर फारुकी त्यांच्या संदर्भात 'सडकछाप अ‍ॅक्टींग' करणारे म्हटलं तर मन्नारनंही त्याला कमी लेखलं. खानजादीने जेव्हापासून अभिषेक कुमारला माफी दिली तेव्हापासून सर्वांच्या नजरा त्यांच्यावर; खिळल्या आहेत. सर्वजण अभिषेकबद्दल बोलत आहेत. उत्तर देताना समर्थ म्हणाला, "अ‍ॅक्टींग तो सही, क्या सडकछाप अ‍ॅक्टींग हो रही है." त्याला प्रतिसाद देताना मन्नारानं अभिषेकची खिल्ली उडवताना म्हटलं, "सडकछाप लगते है." मग ते अभिषेकलाच फक्त गेमबद्दलच्या काही गोष्टी कशा माहिती आहेत यावर चर्चा करतात. समर्थ म्हणाला, ''इसको कुछ आता ही नहीं इसको सिर्फ लडना आता है, हाँ मैं बेहस कर लूँ 2-3 दिन ऑर दिख जाऊंगा."

अंकिता लोखंडेने पुन्हा व्यक्त केली शो सोडण्याची इच्छा

बिग बॉसच्या घरातील यंत्रणा विस्कळीत झाल्यानंतर विकी जैन आणि समर्थ जुरेल यांच्यात कडाक्याचे भांडण झालं. अंकिता लोखंडेही या वादात पडली. तिन्ही घरे विसर्जित झाल्यानंतर, समर्थाने विकी आणि त्यांच्या गटातील सदस्य म्हणून उल्लेख केलेल्या प्रत्येकाची खिल्ली उडवली. अंकिता आणि विकी स्वतःच ठाम उभे राहिले. विकी अंकिताला तिची बॅग घेऊन जाण्यास मदत करत असताना ते घरातून निघून जात असल्याची कमेंट समर्थने केल्याने हा वाद सुरू झाला. यामुळे अंकिता लोखंडे संतप्त झाली आणि त्यांनी समर्थला विनाकारण चिडवण्यापासून परावृत्त करण्याची विनंती केली. यावर अंकिता रडली आणि म्हणाली की ती थकली आहे. "मै टूट रही हू, मुझे घर जाना है" असं ती विकीला म्हणाली.

हेही वाचा -

  1. जॅकी श्रॉफ नीना गुप्ता स्टारर 'मस्त में रहने का' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

2. अजय देवगण 'सिंघम अगेन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी

3. 'कॉफी विथ करण सीझन 8'च्या शोमध्ये दिसणार कियारा अडवाणी आणि विकी कौशल; प्रोमो प्रदर्शित

Last Updated : Dec 5, 2023, 1:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.