ETV Bharat / entertainment

अंकिता लोखंडेशी बोलताना आयेशा खाननं केला मुनावर फारुकीवर गंभीर आरोप - बिग बॉस 17

Ankita Lokhande Reveals : 'बिग बॉस 17'ची स्पर्धक अंकिता लोखंडे ही आयेशा खानची समजूत काढताना दिसली. आयेशानं मुनावर फारुकीवर गंभीर आरोप केला आहे. काय आहे हा आरोप जाणून घ्या.

Ankita Lokhande Reveals
अंकिता लोखंडे यांनी आनंद व्यक्त केला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 11, 2024, 2:20 PM IST

मुंबई - Ankita Lokhande Reveals : अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेला वादग्रस्त शो 'बिग बॉस 17' सध्या खूप चर्चेत आहे. या शोमध्ये दररोज भांडणं पाहायला मिळणं नवीन राहिलेलं नाही. शोमधील स्पर्धा इतकी वाढली आहे की, मित्र असो किंवा पती-पत्नी, प्रत्येक नातेसंबंध वेगळे होताना दिसत आहेत. शोमधील प्रत्येक स्पर्धकाला टास्क कोणत्याही किंमतीत पूर्ण करायचे असते. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचं नात देखील अतिशय संवेदनशील टप्प्यावर आहे. दरम्यान, अंकितानं तिच्या आयुष्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. अंकिता लोखंडेचे विक्की जैनसोबत शोमध्ये रोजच वाद पाहायला मिळत आहेत.

मुनावर फारुकी केला आयेशा खाननं आरोप : अंकिताचे विक्कीसोबतच्या वैवाहिक जीवनातील नात वाईट टप्प्यातून जात आहे, त्यामुळे अंकिताचे अनेक चाहते सध्या नाराज दिसत आहेत. मात्र, काही चाहते तिला सोशल मीडियावर पाठिंबा देताना देखील दिसत आहेत. अंकिता एका एपिसोडमध्ये म्हणताना दिसली की, तिलाही विश्वासघाताचा सामना करावा लागला आहे. यानंतर आयेशा खान रडत रडत अंकिताला सांगते की, ''मुनावर फारुकी जेव्हा नाझिला सीताशीला डेट करत होता, तेव्हा त्यानं तिच्याशी संपर्क साधला होता.'' यानंतर आयेशानं अंकिताला पुढं सांगितलं की, ''या सगळ्यात माझा काय दोष? मी कधीच त्याचे किंवा कोणाचेही वाईट केले नाही. जर तो नाझिलासोबत रिलेशनशिपमध्ये असेल आणि तिच्यासोबत सर्वकाही त्याला चालू ठेवायचे असेल तर, त्यानं माझ्याशी संपर्क साधायला नको होता.''

अंकितानं काढली आयेशाची समजूत : याप्रकरणी अंकितानं आयेशाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि तिनं आपल्या आयुष्यातही अशीच परिस्थिती आली असल्याचं सांगून तिला दिलासा दिला. अंकितानं सांगितलं, ''तू कोणत्या परिस्थितीतून जात आहात ते मी समजू शकते. मी पण या सगळ्याचा सामना केला आहे.'' अंकिता दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. या दोघांचं नात 2016 मध्ये संपलं. जेव्हा अंकिता आणि सुशांतचं ब्रेकअप झालं, तेव्हा तिला अनेक वाईट गोष्टीचा सामाना करावा लागला होता. यानंतर अंकितानं विकी जैनसोबत डिसेंबर 2021 मध्ये लग्न केलं.

हेही वाचा :

  1. 'मोऱ्या'चे दिग्दर्शक जितेंद्र बर्डेने सेन्सॉर बोर्डाकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याचा केला आरोप
  2. मेरी ख्रिसमस स्क्रीनिंगला कथित लव्हबर्ड्स अनन्या आदित्य आणि खुशी वेदांगने वेधले लक्ष
  3. संगीतकार आणि गायक ए.आर.रहमान यांनी केला होता आत्महत्येचाही विचार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.