मुंबई - बहुप्रतीक्षित भुल भुलैय्या चित्रपटाचा ट्रेलर आज लॉन्च करण्यात आला. अनेक रहस्यांनी भरलेला, उत्कंठा वाढवणारा आणि सोबत कॉमेडीचा तडखा असलेला ट्रेलर पहिल्या भुल भुलैय्याची आठवण करुन देतो.
'भूल भुलैया 2' चित्रपटाचा ट्रेलर अनीस बज्मीच्या सिग्नेचर ह्युमर आणि वन-लाइनर्सने सजलेला आहे. ट्रेलर पाहता कथानक जुन्या वळणाने जाताना दिसते. परंतु कार्तिकचे कॉमिक टाइमिंग चित्रपटाला कसे उंचावते हे पाहणे मनोरंजक असेल. हा चित्रपट कार्तिकचा हॉरर-कॉमेडीचा पहिला प्रयत्न असला तरी 2020 मध्ये रिलीज झालेल्या 'लक्ष्मी' चित्रपटानंतर कियारा या शैलीत पुनरागमन करणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
अभिनेत्री तब्बूचाही समावेश असलेला हा चित्रपट भूषण कुमार, मुराद खेतानी आणि कृष्ण कुमार यांनी T-Series आणि Cine 1 Studios च्या बॅनरखाली तयार केला आहे. फरहाद सामजी आणि आकाश कौशिक यांनी लिखित 'भूल भुलैया 2' हा चित्रपट 2007 च्या हिट 'भूल भुलैया'चा स्वतंत्र सिक्वेल आहे ज्यामध्ये अक्षय कुमार, शायनी आहुजा आणि विद्या बालन यांनी भूमिका केल्या होत्या. अनीस बज्मी दिग्दर्शित आणि भूषण कुमार निर्मित, 'भूल भुलैया 2' 20 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - शिल्पा शेट्टीनंतर रोहित शेट्टीच्या पोलीस फोर्समध्ये विवेक ओबेरॉय दाखल