मुंबई - वरुण धवन आणि क्रिती सेनॉनच्या भेडियासोबत जंगलातील हिंस्त्र घटकांचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज व्हा. शुक्रवारी, भेडिया चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या टीझरचे लॉन्चिंग केले. रहस्यमय थ्रिलर असलेल्या हा टीझर आपल्याला कथेत गुंतवून ठेवतो.
अरुणाचल प्रदेशातील गूढ टेकड्या या टीझरमध्ये दिसतात. या जंलाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा घडणार आहे. परंतु टीझरमध्ये कोणत्याही प्रमुख पात्रांचे स्वरूप किंवा चेहरे प्रकट होत नाहीत. लांडगा जंगलातून माणसाचा पाठलाग करत असताना या संक्षिप्त व्हिडिओमध्ये एक शिकारही दाखवण्यात आली आहे. वरुणच्या इंडस्ट्रीतील 10 वर्षांच्या प्रवासाचे औचित्य साधून 19 ऑक्टोबर रोजी भेडिया चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर लॉन्च होणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
टीझरची लिंक शेअर करत वरुणने इंस्टाग्रामवर लिहिले, "बनेंगे इंसान उसका नाश्ता!" भेडियाचा टीझर लॉन्च झाल्यापासून ट्रेंडमध्ये आहे. "रिया कपूरने आणि दिनो मोरियासह अनेकांनी यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
अमर कौशिक दिग्दर्शित भेडिया या हॉरर कॉमेडी चित्रपटात अभिषेक बॅनर्जी देखील मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 25 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. भेडिया हा हॉरर-कॉमेडी ड्रामा हा चित्रपट वरुण धवन आणि क्रिती सेनॉन यांचा दुसरा एकत्रित चित्रपट आहे.
हेही वाचा - पोन्नियिन सेल्वन रिलीज : पाहा, चाहत्यांनी केला कार्तीच्या कटआऊटला दुधाचा अभिषेक