ETV Bharat / entertainment

Bawaal song Dil Se Dil Tak: वरुण धवन आणि जान्हवी कपूर स्टारर 'बवाल' चित्रपटातील दुसरे गाणे प्रदर्शित... - बवाल चित्रपटातील दुसरे गाणे प्रदर्शित

वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या बवाल या चित्रपटातील दुसरे गाणे रिलीज झाले आहे. 'दिल से दिल तक' हा ट्रॅक लक्ष्य कपूर, आकाशदीप सेनगुप्ता आणि सुवर्णा तिवारी यांनी गायला आहे.

Bawaal
बवाल
author img

By

Published : Jul 14, 2023, 7:19 PM IST

मुंबई: जान्हवी कपूर आणि वरुण धवन स्टारर आगामी 'बवाल' या चित्रपटामधील दुसरे गाणे रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी शुक्रवारी 'दिल से दिल तक' हे दुसरे गाणे रिलीज करून प्रेक्षकांना उत्तम अशी भेट दिली. या गाण्यात वरुण आणि जान्हवी पॅरिसच्या रोडवर सायकल चालविताना दिसत आहे. दरम्यान आता या गाण्याची झलक जान्हवी कपूरने देखील तिच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. ज्यात तिने कॅप्शन दिले, 'छलक गये नैना, तूने मन भर दिया...मेरे खली से दिल को यूँ, तूने घर कर दिया'.. हे गाणे आऊट झाले आहे.' या गाण्याला आकाशदीप सेनगुप्ता यांनी संगीतबद्ध केलेले असून या हे गाणे लक्ष्य कपूर आणि सुवर्णा तिवारी यांनी गायले आहे. तसेच या गाण्याचे बोल हे कौसर मुनीर यांनी लिहिले आहेत.

अ‍ॅमेझॉन प्राईमवर होणार प्रदर्शित : नितेश तिवारी दिग्दर्शित, ' बवाल' हा चित्रपट २१ जुलैपासून अ‍ॅमेझॉन ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतेच 'तुमसे कितना प्यार करते' हे गाणे रिलीज केले होते, आणि हे गाणे अरिजित सिंगने गायले आहे. या गाण्याला मिथूनने संगीतबद्ध केले आहे.

वरुणने 'बवाल' या चित्रपटाबाबत सांगितले : वरुणने या चित्रपटामधील त्याच्या भूमिकेबाबत सांगितले होते की, 'बवाल हा माझ्यासाठी एक आव्हानात्मक प्रवास होता, परंतु तो सर्वात रोमांचक आणि अत्यंत फायद्याचा प्रवास देखील होता. या चित्रपटात, अज्जू हे पात्र फार लोकप्रिय असूनही तो सतत त्याच्या नियंत्रणाबाहेरील परिस्थितीशी झुंज देत आहे. हे पात्र अतिशय गुंतागुंतीने विणले गेले आहे. अक्षरशः, हे पात्र माझ्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण करू गेले आहे. अज्जू आणि निशाची ही सुंदर रोमँटिक कहणी पाहण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी मी आता जगभरातील प्रेक्षकांची प्रतीक्षा करू शकत नाही.' असे त्याने म्हटले होते.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

जान्हवीने 'बवाल' या चित्रपटाबाबत सांगितले : जान्हवीने देखील या चित्रपटाबाबत सांगितले की तिचा आगामी चित्रपट एक अनोखी प्रेमकथा आहे ज्यामध्ये ती आशा आणि स्वप्नने बघत असलेल्या एका साध्या मुलीची भूमिका साकारत आहे. 'अभिनेत्री म्हणून मी आपल्यासाठी तयार केलेल्या भूमिका स्विकारते. पण क्वचितच आपल्याला अशी प्रतिष्ठित भूमिका साकारण्याची संधी मिळते ज्यामुळे अभिनयाची अधिक संधी मिळते. आशा आणि स्वप्नने बघणाऱ्या या मुलीची कहाणी खूप गोड आहे. या चित्रपटात अनुभवलेल्या प्रत्येक भावना ती तुम्हाला अनुभवायला लावेल'. या चित्रपटामध्ये जान्हवी आणि वरुण पहिल्यांदा एकत्र काम करणार आहे. त्यामुळे हा चित्रपट कसा असे हे येणाऱ्या काही दिवसात समजेल.

हेही वाचा :

  1. MI 7 Collection Day 2 : 'मिशन इम्पॉसिबल ७' या चित्रपटाची जादू भारतीय बॉक्स ऑफिसवर कायम...
  2. Marathi film Ankush : 'अंकुश'सह नव्या निर्मात्याची दमदार एन्ट्री, बिग बजेट चित्रपटांची करणार मराठीत निर्मिती
  3. Karan Deol and Drish Acharya : सनी देओलचा मुलगा करण देओल आणि सून द्रिशा आचार्य मुंबई विमातळावर झाले स्पॉट...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.