ETV Bharat / entertainment

मराठ्यांच्या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा, 'बलोच' प्रदर्शित होणार ‘या’ तारखेला! - Baloch director Prakash Janardhan Pawar

पानिपतच्या पराभवांनंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांनी अनुभवलेल्या भयाण वास्तवावर भाष्य करणारा चित्रपट ‘बलोच’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा असलेल्या या चित्रपटात प्रवीण तरडे यांची प्रमुख भूमिका असून कथा, दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांचे आहे.

Baloch movie poster
बलोच चित्रपटाचे पोस्टर
author img

By

Published : May 2, 2022, 4:49 PM IST

मुंबई - पानिपतच्या पराभवांनंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांनी अनुभवलेल्या भयाण वास्तवावर भाष्य करणारा चित्रपट ‘बलोच’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा डोळ्यांसमोर उभी करणारा धगधगता चित्रपट म्हणजे 'बलोच'. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा असलेल्या या चित्रपटात प्रवीण तरडे यांची प्रमुख भूमिका असून कथा, दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांचे आहे.

Baloch movie poster
बलोच चित्रपटाचे पोस्टर

पोस्टरमध्ये बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे दिसत आहेत. या सर्वांमध्ये प्रवीण तरडे यांची करारी मुद्रा सर्वांच्या नजारा खिळवून घेणारी आहे. त्यांच्या डोळ्यांतील धगधगणारी आग अनेक भावना व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता 'बलोच'च्या निमित्ताने पुन्हा एकदा इतिहासातील आठवणींना उजाळा मिळणार आहे.

विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर फिल्म्स प्रस्तुत, जीवन जाधव, महेश करवंदे (निकम) संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, जितेश मोरे, सहनिर्माते गणेश शिंदे, दत्ता काळे, सुधीर वाघोले, विजय अल्दार निर्मित हा चित्रपट २०२२ मध्ये दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा - लग्नात डान्स करण्यासाठी हे बॉलिवूड स्टार्स घेतात एवढी रक्कम, जाणून घ्या भाव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.