मुंबई : बाईपण भारी देवा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. रिलीज झाल्यापासून 23साव्या दिवसापर्यंत 62.59 कोटी रुपयांचे आश्चर्यकारक कलेक्शन करून याने ब्लॉकबस्टर दर्जा प्राप्त केला आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत असून अशी अभिनेत्रींची तगडी स्टारकास्ट आहे. चित्रपटातील कलाकारांचा उत्तम अभिनय, उत्कृष्ट कथानक, सुरेल गाणी अन् दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या अष्टपैलू दिग्दर्शनामुळे बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटाचा अनेक दिवसांनी बोलबाला झाल्याचे दिसून येत आहे.
पार करू शकतो 100 कोटींचा टप्पा : बाईपण भारी देवा या मराठी सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. नागराज मंजुळेचा सैराट आणि रितेश देशमुखच्या 'वेड'च्या तोडीसतोड हा सिनेमा आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. आता हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमाने प्रदर्शना आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. सहा बहिणींच्या कथेच्या माध्यमातून 'बाईपण भारी देवा' सिनेमाने प्रत्येक स्त्रीला जगण्याचा नवा अर्थ देत स्वतःसाठी जगायला शिकवले. सिनेमाच्या प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसवर त्याची सुरू असलेली घोडदौड प्रेक्षकांच्या पसंतीची मोठी पोचपावती म्हणावी लागेल. हा सिनेमा प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसवर कमाई करण्यासोबतच नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवताना दिसत आहे.
हिरो हिरोईनशिवाय चित्रपटाची कथा : या चित्रपटाला IMDb वर 10 पैकी 8.9 रेटिंग देण्यात आली आहे. चित्रपटाची कथा लोकांना खूप आवडली आहे. पाच बहिणींची कथा असलेल्या या चित्रपटात मुख्य भूमिकेत 5 ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. या कथेत पाचही बहिणी एका स्पर्धेत भाग घेत आहेत. त्याचबरोबर कुटुंबाची काळजी घेताना प्रत्येक निकष पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न सर्वजण करत आहेत. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाला चांगलीच पसंती मिळत आहे. बऱ्याच दिवसांनी एक अनोखी कथा यशस्वी झाल्यामुळे निर्मात्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या माने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा :