ETV Bharat / entertainment

Ayushmann Khurrana : 'ड्रीम गर्ल २' चित्रपटामधील आयुष्मान खुरानाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या समोर... - Dream Girl 2 First Look

आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर कॉमेडी-ड्रामा आगामी चित्रपट 'ड्रीम गर्ल २'चा फर्स्ट लूक समोर आला आहे. 'ड्रीम गर्ल २' हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

Ayushmann Khurrana
आयुष्मान खुराना
author img

By

Published : Jul 25, 2023, 1:24 PM IST

मुंबई : आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर कॉमेडी-ड्रामा आगामी 'ड्रीम गर्ल २' चित्रपटातील आयुष्मान खुरानाचा फर्स्ट लूक आता समोर आले आहे. निर्मात्यांनी २५ जुलै रोजी चित्रपटामधील आयुष्मानचा पूजा म्हणून पहिला लूक सादर केला आहे. आयुष्मानचा हा चित्रपट २५ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. आता चित्रपटाच्या रिलीजच्या महिनाभर आधी आयुष्मान खुरानाचा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत आणखी उत्सुकता वाढली आहे. 'ड्रीम गर्ल २'चे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. या चित्रपटाचा पहिला भाग हा २०१९मध्ये प्रदर्शित झाला होता. आधीच्या 'ड्रीम गर्ल' चित्रपटामध्ये आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते.

आयुष्मान खुराणा दिसणार पुजाच्या अवतारात : दरम्यान यावेळी 'ड्रीम गर्ल २' चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत स्टार किड अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराणा हा पूर्वीच्या अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. २०१९मध्ये प्रदर्शित झालेला 'ड्रीम गर्ल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. या चित्रपटामधील गाणे सुद्धा खूप लोकप्रिय झाले होते. या चित्रपटाची कहाणी खूप हटके असल्याने हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. दरम्यान आता आयुष्मान लूक हा सोशल मीडियावर प्रदर्शित झाल्यानंतर युजर या पोस्टवर कमेंट करत आहेत.

आयुष्मानला पूजा नावाने चाहत्यांनी चिडवले : आयुष्मानने चित्रपटातील त्याचा पहिला लूक शेअर करत लिहिले, ही फक्त पहिली झलक आहे, वस्तू आरशात दिसण्यापेक्षा सुंदर आहेत! असे त्याने त्याच्या पोस्टला कॅप्शन दिले आहे. 'ड्रीम गर्ल २' या चित्रपटातून समोर आलेल्या आयुष्मान खुरानाचा फर्स्ट लूक नक्कीच तुम्हाला देखील आवडेल. फर्स्ट लूकमध्ये आयुष्मान हा पूजाच्या अवतारात हॉट दिसत आहे तर दुसरीकडे आरशात त्याचे खरे लूक दिसत आहे. आयुष्मान त्याच्या दोन्ही लूकमध्ये लिपस्टिक लावताना दिसत आहे. दरम्यान यावेळी पुन्हा अन्नू कपूरसोबत विजय राज, परेश रावल आणि राजपाल यादव हे कलाकारही प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटाची निर्माती एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूरनी केली आहेत.

हेही वाचा :

  1. PRABHAS KALKI 2898 AD : 'प्रोजेक्ट के' लांबणीवर, 'कल्की २८९८ एडी' चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेत 'मोठा' फेरफार
  2. Kareena Kapoor vacation : करीना कपूरची युरोप सहल, शेअर केले मुलांसोबतचे सुंदर फोटो
  3. Dhindhora Baje Re Song out : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटामधील 'ढिंढोरा बाजे रे' गाणे रिलीज...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.