मुंबई - समंथा रुथ प्रभू तिच्या आगामी पौराणिक ड्रामा चित्रपट शाकुंतलमचे प्रमोशन करत असल्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. समंथा रुथ प्रभूचा शाकुतलम हा चित्रपट १४ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.प्रमोशनच्या वेळी समंथाने तिच्या आयुष्यातील अंधाराचा काळ, मायोसिटिस आजाराशी तिचा संघर्ष आणि माजी पती नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यानंतर त्याने शोभिता धुलिपालासोबत जवळीक तयार करणे याबद्दल भाष्य केले.
नागा चैतन्यासाठी सर्वस्व दिले होते - समंथा नागा चैतन्यसोबतच्या तिच्या अयशस्वी संबंधांबद्दल बोलली आहे. संमथाने म्हटले आहे की प्रेमाच्या बाबतीत ती अस्वस्थ नाही. परंतु अद्याप ती पूर्णपणे बरी झालेली नाही कारण तिने लग्नासाठी आपले 100 टक्के सर्वस्व वाहिले. परंतु दुर्दैवाने ते फलद्रूप झाले नाही. दुसरीकडे, नागा चैतन्य आयुष्यात पुढे सरकला आहे आणि आता काही महिन्यांपासून तो शोभिताला डेट करत असल्याचे सांगितले जात आहे.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाबद्दल समंथाची प्रतिक्रिया - शाकुंतलमच्या एका प्रमोशनल मुलाखतीदरम्यान, नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या कथित प्रणयाबद्दलच्या अफवांवर समंथाने प्रतिक्रिया दिली. कोण कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे याची तिला पर्वा नाही, असे समंथाने सांगितले. तिने कोणाचेही नाव घेतले नसले तरी, समंथा म्हणाली की, 'ज्याला प्रेमाचे मूल्य माहीत नाही त्याने कितीही लोकांशी डेट केले तरीही ते अश्रू ढाळतील.'35 वर्षीय अभिनेत्री समंथाने पुढे सांगितले की, 'किमान त्या मुलीने आनंदी असले पाहिजे. जर त्याने आपले वागणे बदलले आणि मुलीला न दुखावता तिच्याकडे लक्ष दिले तर ते सर्वांसाठी चांगले होईल.'
नागा चैतन्य आणि शोभिताच्या रोमान्सची हवा - नुकतेच नागा चैतन्य आणि शोभिता यांचा लंडनच्या रेस्टॉरंटमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर ते आणखीनच चर्चेत आले आहेत. दोघांनी अद्याप त्यांचे नाते अधिकृत केले नसताना, शोभिता आणि नागा चैतन्य हे जोडपे म्हणून जोर धरत असल्याच्या अफवा पसरत आहेत.
हेही वाचा - Bholaa Box Office Collection Day 5: भोला चित्रपटाच्या कमाईची गती वाढली, ५० कोटीपर्यंत पोहोचला आकडा