मुंबई - बॉलिवूडचा पठाण शाहरुख खान जवान चित्रपटाच्या प्रीव्ह्यूला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादमुळे खूप आनंदीत आहे. दरम्यान सलमान खाननेही जवनाचा प्रीव्ह्यू पाहिल्याचे कळवलंय. शाहरुख खानने प्रीव्ह्यू रिलीज झाल्यानंतर 'आस्क मी एसआरके' सेशन ट्विटरवर आयोजित केले होते. यात तो आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना जवानच्या शुटिंग दरम्यानचे किस्से आणि अनुभव शेअर करत आहे. काही वेळापूर्वीच शाहरुख खान ट्विटरवर आला होता आणि त्याने तमाम चाहत्यांना प्रतिक्रिया दिल्या. त्याला प्रश्न विचारण्यासाठी फॅन्समध्ये चढा ओढ लागल्याचे पाहायला मिळाले होते.
जवान चित्रपटाचा प्रीव्ह्यू शाहरुखची पत्नी गौरी आणि मुलगा अबराम खानला कसा वाटला, असा प्रश्न चाहत्यांनी किंग खानला विचारला. एका चाहत्याने त्याच्या टकल्या लूकबाबतचाही प्रश्न विचारला. जवान चित्रपटात अरजित सिंगने गाणे गायले आहे का असाही त्याला सवाल करण्यात आला. जवान सिनेमानंतर डंकी व त्यानंतर २०२४ मध्ये कोणता चित्रपट तो करणार असल्याचाही एक प्रश्न त्याला विचारण्यात आला. या सर्व प्रश्नांना उत्तरे देताना शाहरुख खान नेमका काय म्हणाला हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करुयात.
प्रश्न - गौरी खान आणि अबरामला कसा वाटला जवानचा प्रीव्ह्यू ?
उत्तर दोताना शाहरुख म्हणाला की, गौरी आणि अबरामला जवानचा ट्रेलर खूप आवडला आहे. अबराम हा ट्रेलर वारंवार पाहात आहे.
प्रश्न - तुमचा बाल्ड लूक छान आहे, तुम्हाला कसा वाटला?
किंग खान म्हणाला की, मला कात्री वाटत नव्हती पण मी खूप खूश आहे.
मेट्रोमधील 'बेकरार करके हमे यूँ न जाइए' डान्स चांगला होता, कसा केला?
ही आयडिया दिग्दर्शक अॅटली सर यांची होती आणि ते खूप शानदार दिग्दर्शक आहेत.
जवान हा शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ७ सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनला सध्या सुरूवात झाली असून याचा प्रीव्ह्यू प्रेक्षक पाहात आहेत. हा प्रीव्ह्यू म्हणजे कच्चा ट्रेलरच आहे. जवानचा मुख्य ट्रेलर ऑगस्ट महिन्यात रिलीज केला जाणार आहे. याचा लॉन्चिंग सोहळा चेन्नईत आयोजित केला जाणार असून याला साऊथमधील दिग्गज स्टार्स हजर राहतील अशी योजना आहे.
हेही वाचा -
१. Spkk Collection Week 2 : 'सत्यप्रेम की कथा'ने गुडघे टेकले, टॉम क्रूझचा वारु सुसाट
२. Suniel Shetty : सुनिल शेट्टीला टोमॅटो महाग, नेटीझन्सनी केली खरडपट्टी
३. Srk's In Bald Look : शाहरुखच्या बाल्ड लूकवर फॅन्स फिदा, पोस्टवर प्रेमाचा वर्षाव