ETV Bharat / entertainment

आई ऐश्वर्या रायने लेक आराध्याला दिल्या ११ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन आज 11 वर्षांची झाली. आराध्याला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी, आई ऐश्वर्याने सोशल मीडियावर मुलीसोबतचा एक मोहक फोटो शेअर केला.

author img

By

Published : Nov 16, 2022, 4:22 PM IST

आराध्याचे चुंबन घेताना ऐश्वर्या राय बच्चन

मुंबई - ऐश्वर्या राय बच्चनने तिची मुलगी आराध्या हिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. आज आराध्या ११ वर्षांची झाली आहे. आराध्याला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी, आई ऐश्वर्याने सोशल मीडियावर मुलीसोबतचा एक मोहक फोटो शेअर केला.

फोटोत अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आराध्याचे चुंबन घेताना दिसत आहे. फोटोसोबत तिने एक गोड चिठ्ठीही लिहिली आहे. ऐश्वर्याने लिहिलंय, "माय लव्ह... माय लाईफ... मी तुझ्यावर प्रेम करते, माझी आराध्या."

ऐश्वर्या आणि आराध्या ही आई-मुलीची सुंदर जोडी आहे. ऐश्वर्या ही सर्वात स्टायलिश आणि प्रेमळ आई आहे आणि ती मुलीचे सर्व प्रसंगातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. कौटुंबिक मेळावे असो, रेड कार्पेट इव्हेंट असो किंवा अगदी चित्रपटाचे शूट असो, ऐश्वर्याला आराध्यासोबत जाणे आवडते.

अभिषेक आणि ऐश्वर्या यांचा विवाह 20 एप्रिल 2007 रोजी अमिताभ बच्चन यांच्या एका बंगल्यात - प्रतिक्षा येथे पार पडला होता. गुरु, धूम 2 आणि इतर चित्रपटांमध्ये स्क्रीन स्पेस शेअर केलेल्या या जोडीने 16 नोव्हेंबर 2011 रोजी त्यांच्या पहिल्या मुलीचे आराध्याचे स्वागत केले होते.

दरम्यान, वर्क फ्रंटवर, ऐश्वर्या नुकतीच दक्षिणेकडील दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या मॅग्नम ओपस पीरियड ड्रामा फिल्म पोन्नियिन सेल्वन - 1 मध्ये दिसली होती ज्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. ती रजनीकांत, रम्या कृष्णन, प्रियांका अरुल मोहन आणि शिवा राजकुमार यांच्यासोबत आगामी अॅक्शन चित्रपट जेलरमध्ये दिसणार आहे. चित्रपटाच्या अधिकृत प्रदर्शनाची तारीख अद्याप प्रलंबित आहे.

हेही वाचा - बिग बींनी श्वानाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना लिहिली भावनिक पोस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.