ETV Bharat / entertainment

Anushka Sharma and Virat Kohli : अनुष्का शर्मानं अनोख्या पद्धतीनं दिल्या पती विराट कोहलीला शुभेच्छा - Anushka Sharma

Anushka Sharma and Virat Kohli : आज 5 नोव्हेंबर रोजी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली त्यांचा 35वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त पत्नी अनुष्का शर्मानं त्याला अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यावर विराट कोहलीनं आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Anushka Sharma and virat kohli
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 3:04 PM IST

मुंबई Anushka Sharma and Virat Kohli : अभिनेत्री अनुष्का शर्मानं पती विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विराट हा त्याचा 35वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी अनुष्का शर्मानं विराटचे काही फोटो शेअर केला आहेत. या फोटोंवर तिनं एक प्रेमळ कॅप्शन लिहलं आहे. ज्यामध्ये तिनं विराटच्या कामगिरीबद्दलचे कौतुक केले आहे. अनुष्का ही नेहमीच विराट कोहलीला सपोर्ट करताना दिसत असते. दरम्यान अनेकजण विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा सोशल मीडियाद्वारे देत आहेत. सध्या वर्ल्डकपचे सामने सुरू आहेत. त्यामुळं विराटचे अनेक चाहते या सामान्यासाठी त्याला चीअर करताना दिसत आहे. त्याला वाढदिवसासोबत वर्ल्डकपसाठी देखील शुभेच्छा देताना अनेकजण दिसत आहेत.

अनुष्का शर्मानं विराट कोहलीला शुभेच्छा : अनुष्काच्या पोस्टमध्ये आहे की, 2011 मध्ये त्याच्या टी- 20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 'शून्य' बॉलवर विकेट घेणारा तो एकमेव क्रिकेटर आहे. जिथे त्यानं इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसनची विकेट घेतली. दुसऱ्या फोटोमध्ये विराटचा एक फोटो आहे, ज्यामध्ये तो विचित्र एक्सप्रेशन दाखवत आहे. शेवटचा फोटोत अनुष्का आणि विराटच्या सेल्फीचा आहे. ज्यामध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. अनुष्काच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत. एका चाहत्यानं कमेंट करत लिहलं, 'नेहमीच सुंदर कॅप्शन देते. त्यानंतर दुसऱ्या एकानं लिहलं, 'या वाढदिवशी सर्वात सुंदर पोस्ट' आणखी एकानं लिहलं, 'खुश राहा चिकू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा'. याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

विराट कोहलीचा गोलंदाजीमधील हा खास फोटो : या फोटोमध्ये विराटनं चेंडू न टाकता आपल्या टी - 20 कारकिर्दीतील पहिली विकेट कशी घेतली हे सांगितले आहे. विराट त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी जगभर प्रसिद्ध असला तरी, या पोस्टद्वारे अनुष्कानं त्याच्या एका अशा विक्रमाबद्दल सांगितले आहे, जो सर्वोत्तम गोलंदाजही करू शकले नाहीत. अनुष्काची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

विराटनं ही प्रतिक्रिया दिली : पोस्ट शेअर करताना अनुष्कानं कॅप्शन लिहलं की, 'तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक भूमिका खूप छान साकारली आहे. याशिवाय, तुम्ही आनंदी, मजेदार आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्ती आहात. 'मी तुझ्यावर या आयुष्यात आणि पुढेही प्रेम करेन, कोणतीही परिस्थिती असो मी नेहमीच तुझ्यासोबत आहे. अनुष्काच्या हृदयस्पर्शी पोस्टला उत्तर देताना, विराटनं चेहऱ्यावर हात इमोजी आणि हार्ट इमोजीसह प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा :

  1. Marathi Rangbhumi Din : प्रेक्षकांमधून लोकप्रिय ठरलेल्या 'या' अभिनेत्यांनी नाटकांमधून करियरला केली सुरुवात; जाणून घ्या
  2. Kangana Ranaut : चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर कंगणा राजकारणाच्या मैदानात? 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे दिले संकेत
  3. Shahrukh khan birthday : शाहरुख खाननं वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी सेलिब्रेटींचे मानले मनापासून आभार...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.