मुंबई : मायानगरीतील गेटवे ऑफ इंडिया येथे गुरुवारी रात्री उशिरा ख्रिश्चन डायर फॉल 2023 फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. तेथे बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिचा पती-भारतीय संघाचा मजबूत फलंदाज विराट कोहलीसह आली होती. यादरम्यान पॉवरपॅक कपल रेड कार्पेटवर पापाराझींसाठी पोज देताना दिसले. त्याचवेळी शोमध्ये भाग घेण्यापूर्वी जोडप्याने एक फोटोशूट केले, जे अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.
कॉमेंट बॉक्समध्ये हार्ट इमोजी : अनुष्का शर्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर विराटसोबतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये 'आप' असे कॅप्शन लिहिले आहे. विराट कोहलीने आपल्या सुंदर पत्नीच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. विराटने कॉमेंट बॉक्समध्ये हार्ट इमोजी टाकला आहे. त्याचबरोबर चाहत्याने लिहिले आहे की, हे कपल 'रब ने बना दी जोडी'चे उत्तम उदाहरण आहे. आणखी एका युजरने लिहिले आहे, 'किती मस्त कपल आहे.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सिंपल लूक : फोटोंमध्ये अनुष्का आणि विराटच्या पोशाखांबद्दल सांगायचे तर, अनुष्काने शोसाठी लिंबू पिवळा रंग निवडला होता. ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. या ड्रेसवर तिचा लूक सिंपल दिसत होता. तिने सिल्व्हर इअररिंग्स आणि न्यूड लिपस्टिकने तिचा लूक पूर्ण केला होता. ती लेडी डायर मिनी बॅगसह पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. तर विराटने खाकी सूट, पांढरा शर्ट घातला होता. त्याने स्नीकर्स देखिल घातले होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
इतर सेलिब्रिटी सहभागी : अनुष्का आणि विराट व्यतिरिक्त अनैता श्रॉफ अदजानिया, मैसी विल्यम्स, शिबानी अख्तर, अनन्या पांडे, सोनम कपूर, अथिया शेट्टी, ईशा अंबानी आणि राधिका मर्चंट या कार्यक्रमात सहभागी होणारे हे इतर सेलिब्रिटी होते. 4 वर्षांनंतर अनुष्का शर्मा क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित 'चकडा एक्सप्रेस' या स्पोर्ट्स ड्रामाद्वारे पुनरागमन करणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा : Vaani Kapoor OTT debut : वाणी कपूर मंडला मर्डर्स या नवीन मालिकेतून करणार OTT पदार्पण