मुंबई - Anurag Kashyap sensational disclosure अनुराग कश्यप हा एक अपवादात्मक भारतीय निर्माता दिग्दर्शक आहे जो परदेशातील प्रत्येक फिल्म फेस्टीव्हलला हजेरी लावण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला भारताबाहेरील भाषेमध्ये चित्रपट निर्माण करण्याची कोणतीही महत्त्वकांक्षा नाही तरीही तो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चुकवत नाही. अलिकडेच त्याने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलंय की त्याचे चित्रपट जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. मात्र दुर्दैवाने हिंदी भाषिक प्रेक्षकांना मात्र फारसे आवडत नाहीत. यामध्येच भर घालताना त्याने बॉलिवूडच्या समानतेवरही प्रश्न उपस्थित केला. तो म्हणाला की, इथे चित्रपटांचे यश फिल्म इंडस्ट्रीतील प्रमेशनवर अवलंबून असते.
एका वेबलॉइडशी बोलताना अनुराग म्हणाला की बॉलिवूडची फिल्म इंडस्ट्रीही मोठ्या प्रमाणावर व्यापार, बॉक्स ऑफिस आणि स्टार सिस्टम हाताळत असते. यासाठी त्याने दक्षिणेतील मल्याळम आणि तमिळ फिल्म इंडस्ट्रीतील उदाहरणेही दिली.
अनुराग म्हणाला की साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्येही स्टार सिस्टम आहे, तरीही तमिळ फिल्म इंडस्ट्री पाच हिट चित्रपटांची निर्मिती प्रमुख कलाकारांशिवाय करुन शकते. ही त्यांच्यात असलेली एक प्रकारची समानता आहे. मॉलिवूडमध्ये चित्रपट फारशा प्रमोशन शिवाय रिलीज होतात. तामिळनाडूत प्रत्येकाला समान खर्चात प्रमोशनची संधी मिळते, तिथेही कमाल मर्यादा आहे. बॉलिवूडमध्ये मात्र मोठ्या चित्रपटांच्या प्रमोशनच्या दबावाखाली छोटे चित्रपट गायब होऊन जातात.
यावेळी बोलताना अनुराग कश्यपने सलमान खानच्या 'एक था टायगर' मुळे त्याच्या 'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपटाला कसा फटका सहन करावा लागला होता याचा किस्सा सांगितला. तो म्हणाला, 'लोक आजही 'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपटाची चर्चा करतात परंतु केवळ नऊ दिवसात चित्रपट थिएटरमधून उतरावा लागला होता. कारण त्या दरम्यान एक था टायगर रिलीज होणार होता आणि त्यासाठी थिएटर रिकामे करायचे होते. हा स्टार अथवा निर्मात्याचा निर्णय नव्हता तर थिएटर्सचा निर्णय होता. त्या चित्रपटाने नऊ दिवसात जर २६ कोटींचा व्यवसाय केला होता आणि वेळ मिळाला असता तर चित्रपट अजूनही अधिक कमाई करु शकला असता.'
अशा प्रकारच्या घटनांसाठी थिएटर्स कशी कारणीभूत ठरतात हे अनुराग कश्यपने सांगण्याचा प्रयत्न केला. 'गँग्स ऑफ वासेपूर' हा चित्रपट २०१२ मध्ये दोन भागात रिलीज झाला. पहिला भाग २२ जून आणि दुसरा भाग ८ ऑगस्ट रोजी रिलीज करण्यात आला होता. तर 'एक था टायगर' हि चित्रपट १५ ऑगस्ट २०१२ मध्ये थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला होता.
हेही वाचा -
२. Aparna Nair Found Dead At Home : केरळमधील घरी मृतावस्थेत आढळली अभिनेत्री अपर्णा नायर