ETV Bharat / entertainment

anupam kher : अनुपम खेर आणि जया बच्चन यांनी मणिपूर हिंसाचारवर व्यक्त केला आपला संताप... - संताप व्यक्त केला

Manipur Violence : मणिपूर हिंसाचाराची आग देशभर पसरत आहे. दोन महिलांचे लैंगिक शोषण झाल्याच्या प्रकरणाने देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. मणिपूरमधील निर्दयी पुरुषांच्या टोळीने उघडपणे दोन महिलांच्या इज्जतीचा भंग केला आहे, त्यामुळे संपूर्ण देशातून या आरोपींवर संतापाचा वर्षाव होत आहे. आता अनुपम खेर यांनीही या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

anupam kher
अनुपम खेर
author img

By

Published : Jul 21, 2023, 3:11 PM IST

मुंबई : मणिपूरमधील महिलांची नग्न परेड केल्याचा व्हिडीओ समोर आल्यापासून संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच शॉकमध्ये आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वजण संताप व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी आपली प्रतिक्रिया याप्रकरणी दिली आहे. आता या यादीत अनुपम खेर यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. अनुपम खेर यांनी, असे कृत्य करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

अनुपम खेर पोस्टवर येत आहे कमेंट : अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, मणिपूरमध्ये दोन महिलांसोबत राक्षसी वृत्तीची घटना लज्जास्पद आहे. माझ्या मनात खूप संतापही जागृत झाला आहे. मी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला विनंती करतो की या घृणास्पद कृत्याला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी. अशी शिक्षा जी भविष्यात विचार करूनही थरकाप उडले.

वापरकर्ते करत आहे कमेंट : अनुपम खेर यांच्या पोस्टवर अनेक लोक कमेंट करत आहेत. कमेंट करत एका यूजरने लिहिले, यांना आताच शिक्षा व्हायला हवी. यांना थेट फासावर लटकवण्याची हिंमत कोणी करणार नाही. दरम्यान याप्रकरणी एका युजरने अनुपम खेरला टोमणा मारला. त्याने पोस्टवर कमेंट करत लिहले, तुम्हीही बराच वेळ झोपलात, आज तुम्हाला मणिपूरची आठवण येत आहे, तुम्हा लोकांना आता चित्रपट बनवण्याची संधी मिळाली आहे.

जया बच्चनने केला संपात व्यक्त : जया बच्चन यांनीही याप्रकरणी आपला संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओबद्दल बोलताना जया बच्चनने म्हटले, 'मला इतके वाईट वाटले की मी संपूर्ण व्हिडिओ पाहू शकले नाही. महिलांची काळजी कोणीच घेत नाही. महिलांना अत्यंत वाईट वागणूक दिली जाते. हे खूप निराशाजनक आहे. महिलांसोबत रोज काही ना काही घडत असते. हे अतिशय दुःखद आहे. याआधी याप्रकरणी अक्षय कुमार, सोनू सूद, रकुल प्रीत सिंग आणि बॉलीवूडमधील 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केले होते आणि याला लाजिरवाणे म्हटले होते.

देशभरात संताप व्यक्त केला जात आहे : मणिपूरमध्ये काही लोकांनी दोन महिलांची नग्न परेड केली आणि या लोकांनी या महिलांवर लैंगिक अत्याचारही केल्याचे बोलले जात आहे. आता या प्रकरणामुळे देशभर संताप व्यक्त होत असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा :

  1. Prabhas : 'प्रोजेक्ट के'च्या खऱ्या नावाचा झाला खुलासा ; जाणून घ्या....
  2. Kamal Hasan in Project K : 'म्हणून मी हा चित्रपट स्वीकारला...' कमल हासनने सांगितले 'प्रोजेक्ट के' स्वीकारण्याचे कारण
  3. Arjun Rampal : अर्जुन रामपाल ५० व्या वर्षी चौथ्यांदा झाला बाबा ; गर्लफ्रेंडने दिला बाळाला जन्म...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.