ETV Bharat / entertainment

Sonu Sood's picture drawn from rice : श्रमिकांचा मसिहा सोनू सूदवर २५०० किलो तांदळाचा अभिषेक, उभारले तांदळातून भव्य चित्र

मध्य प्रदेशातील देवास येथील तुकोजी राव पवार स्टेडियमवर अभिनेता सोनू सूदचे भव्य चित्र रेखाटण्यात आले. तांदळाचा वापर करुन बनवलेल्या या चित्रासाठी २५०० किलो तांदूळ लागला. नंतर हा सर्व तांदूळ कष्टकऱ्यांना वाटण्यात आला. सोनूने केलेल्या मदतीची उतराई म्हणून हा उपक्रम हेल्पिंग हँड्स वेल्फेयर सोसायटी, देवास येथील कार्यकर्त्यांनी राबवला, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Apr 11, 2023, 5:51 PM IST

मुंबई - गेल्या काही वर्षांपासून असली हिरो म्हणून सोनू सूदचे नाव घेतले जाते. पडद्यावरील हिरो अनेक उदात्त कामे करीत असतो. परंतु खऱ्या आयुष्यात मात्र तो तसा असेलच असे नाही. किंबहुना जवळपास कोणताही पडद्यावरील हिरो सारखे खरे आदर्श आयुष्य जगत नाही. बऱ्याचदा पडद्यावरील आणि खासगी आयुष्यातील त्यांच्या इमेज परस्परविरोधी असतात. परंतु एक स्टार लोकांच्या नजरेत भरला तो म्हणजे सोनू सूद. तो पडद्यावर हिरोची कामे करतोच. परंतु बऱ्याचदा तो व्हिलन म्हणून प्रेक्षकांना सामोरा जातो. तरीही लोक त्याला खरा हिरो म्हणतात याचे कारण म्हणजे तो करीत असलेली समाजसेवा.

सोनू सूद
सोनू सूद

लॉकडाऊनच्या कठीण काळात सोनू सूदचा पुढाकार - दोन वर्षांपूर्वी आपण सर्वांनीच कोरोना कालखंड अनुभवला. लॉकडाऊन मधील अनेकांच्या हालअपेष्टा निरनिराळ्या असल्यातरी दुःख सारखेच होते. अनेकांच्या या दुःखावर सोनू सूदने फुंकर घातली. मुंबईत अनेक कामगार लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झाले. हीच परिस्थिती संपूर्ण देशात झाली होती. काम नाही म्हणून पैसे नाही, पैसे नाही म्हणून खायला नाही. अशा परिस्थितीत ते कामगार आपापल्या गावी जाऊ पाहत होते. परंतु प्रवासासाठी असणारी सर्व व्यवस्था बंद होती. त्यामुळे अनेकांनी पायीच मार्गक्रमण सुरू केले आणि हजारो मैल दूर असलेल्या आपल्या गावी पायी जायला निघाले. अर्थात हे सर्व भयंकर वाटत होते. वाईट दिसत होते. परंतु त्या कामगारांवर कोणती कुऱ्हाड कोसळली होती त्याची त्यांनाच जास्त कल्पना होती. अजून एका इसमाला ते जाणवत होते म्हणून त्या कठीण प्रसंगी तो या लोकांसाठी कणखरपणे उभा राहिला, आणि तो इसम म्हणजे सोनू सूद.

श्रमिकांचा मसिहा बनला सोनू सूद - जेव्हा शासन आणि शासकीय अधिकारी या लोकांसाठी काहीच करीत नव्हते तेव्हा सोनू सूदने सर्व कामगारांसाठी बसेसची व्यवस्था केली. मुंबईमध्ये बहुतांश कामगारवर्ग भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेला असतो. त्यामुळे सोनूने त्याच्या टीमच्या मदतीने उत्तम व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक दाखवत जास्तीत जास्त लोकांना आपल्या गावी धाडलं. त्यावेळी त्याला देवदूत अशी उपमा देण्यात आली होती. त्याने मोबाईलद्वारे संपर्क साधून अनेकांना आर्थिक तसेच इतर मदत केली. आजही तो लोकांच्या मदतीला धावून जात असतो. या लोकप्रिय कलाकाराला नेहमीच सोन्याचे हृदय असलेल्या माणसाची उपमा दिली जाते. आता सोनू सूदचे चाहते आणि फॅन्स यांनी त्याला तांदळात न्हाऊन काढले आहे. म्हणजे त्यांनी त्याच्या फोटोवर २५०० किलो तांदळाचा अभिषेक केला आहे.

२५०० किलो तांदळाचा वापर करुन सोनूचे चित्र - सोनू सूदच्या चाहत्यांनी त्याच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी अनोखा मार्ग निवडला आहे. त्यांनी आपल्या प्रिय व्यक्ती आणि स्टार-अभिनेता याच्यासाठी खास गोष्ट केली आहे. अनेक राज्यांतून सोनूचे चाहते मध्य प्रदेशातील देवास येथे जमले होते. तेथील तुकोजीराव पवार स्टेडियमवर त्याचे भव्य चित्र काढण्यात आले. तब्बल एक एकर जमिनीवर २५०० किलो तांदूळ वापरून सोनू सूदचे भव्य चित्र काढण्यात आले. यामागील प्रेरणा ही आहे की सोनूने असंख्य लोकांच्या घरात रेशनचे सामान भरले आणि कदाचित त्याची उतराई म्हणून हा उपक्रम चाहत्यांनी हाती घेतला. इतकेच नव्हे तर नंतर हा २५०० किलो तांदूळ गरजू आणि तळागाळातील लोकांना दान करण्यात आला आहे.

सोनू सूदला समाधान - या उपक्रमाबद्दल माहिती मिळताच सोने सूद ने कृतज्ञता व्यक्त केली आणि म्हणाला, 'मी माझी सामाजिक बांधिलकी सांभाळत असतो. परंतु चाहते माझ्यावर इतके प्रेम करतात हे बघून उर भरून येतो, अभिमान वाटतो त्यांचा. मी त्यांचा ऋणी आहे की ते माझ्याबद्दल असा विचार करतात. माझे चाहतेदेखील गरजूंच्या उपयोगी पडत आहेत ही गोष्ट सुखावणारी आहे.' वर्क फ्रंट वर सोनू सूद सध्या फतेह या चित्रपाटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे ज्यात त्याची नायिका आहे जॅकलिन फर्नांडिस.

हेही वाचा - Ajay Devgan : अजय देवगणचे ‘शिवा’ कनेक्शन; चित्रपटांच्या नावांमध्ये दिसतो शिवाचा वास...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.