ETV Bharat / entertainment

Ankita Lokhande Father Death : अंकिता लोखंडेच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर... - अंकिता लोखंडे कर्तव्य पार पाडले

अंकिता लोखंडेचे वडील शशिकांत लोखंडे यांनी शनिवारी जगाचा निरोप घेतला. रविवारी लोखंडे कुटुंबीयांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

Ankita Lokhande Father Death
अंकिता लोखंडेच्या वडिलांचा मृत्यू
author img

By

Published : Aug 13, 2023, 3:09 PM IST

मुंबई : टिव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या डोक्यावरून वडिलांची सावली उठली आहे. अंकिताचे वडील शशिकांत लोखंडे यांचे आदल्या दिवशी निधन झाले. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. वडिलांच्या अंत्यसंस्कारात अंकिता तिच्या आईची काळजी घेताना दिसली. अंकिता लोखंडे हिच्या वडिलांच्या पार्थिवावर ओशिवरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून वडिलांच्या अंत्यसंस्काराला पोहोचलेली अंकिता तिच्या आईला धीर देताना दिसली. वडिलांच्या निधनाने अंकिता आणि तिची आई खचून गेल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर या अंत्ययात्रेचे काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये अंकिताचा पती विकी जैन तिला सांभाळताना दिसत आहे.

अंकिता लोखंडे कर्तव्य पार पाडले : काही व्हिडिओमध्ये अंकिता लोखंडे रडताना दिसत आहे. या दुःखाच्या काळात, अंकिताचा सर्वात मोठा आधार तिचा पती विकी जैन बनला, जो तिचे सांत्वन करताना दिसत आहे. अंकिता लोखंडेने वडिलांच्या अंत्यसंस्कारात मुलाचे कर्तव्य पार पाडले. तिने तिच्या वडिलांच्या तिरडीला खांदा दिला. अंकिता लोखंडेच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला अनेक टेलिव्हिजन स्टार्स उपस्थित होते. श्रद्धा आर्यसह अनेक स्टार्सनी ओल्या डोळ्यांनी तिच्या वडिलांना निरोप दिला. याशिवाय नंदीश संधू, तुषार टंडन यांसारख्या सेलिब्रिटींनी लोखंडे कुटुंबियांची भेट घेऊन शोक व्यक्त केला आहे.

अंकिता लोखंडेच्या वडिलांचा मृत्यू कसा झाला? : अंकिता लोखंडेच्या वडिलांचे निधन कसे झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. १२ ऑगस्ट रोजी सकाळी अंकिताच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. ते बरेच दिवसांपासून आजारी होते. काही काळापूर्वी त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. अंकिताने सोशल मीडियावर तिच्या वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा देणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये, अंकिता तिच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये फुले देऊन प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. यादरम्यान तिने एक भावनिक पोस्ट लिहून तिच्या वडिलांनी तिला प्रत्येक पावलावर साथ दिल्याचे सांगितले होते.

हेही वाचा :

  1. Sridevi's 60th Birthday : श्रीदेवीच्या वाढदिवसानिमित्त पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी कपूर, जान्हवी कपूरने थ्रोबॅक फोटो केला शेअर...
  2. Gadar 2 box office Collection Day 2 : 'गदर २'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा; सनी देओलच्या सिनेमाची आजवरची सर्वात मोठी कमाई
  3. Sridevi 60th Birthday : श्रीदेवीच्या ६०व्या वाढदिवसाची गुगलकडून खास आठवण, डुडलमध्ये दाखविला चित्रपटसृष्टीतील प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.